Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्यावरही पुन्हा पुन्हा युरीन येते? कारण जाणून घ्या

Urine comes back again and again even after drinking less water in winter? Know the reasonहिवाळ्यात पाणी कमी प्यायल्यावरही पुन्हा पुन्हा युरीन येते? कारण जाणून घ्या Marathi  Health Tips Arogya Marathi  Lifestyle Marathi In Webdunia Marathi
, सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (20:47 IST)
हिवाळ्यात, काही लोकांचा दिवस पाणी पिण्यात आणि पुन्हा पुन्हा टॉयलेट जाण्यात निघून जातो. हिवाळ्यात 5-6 वेळा टॉयलेट(युरीन) जावं लागणं हे सामान्य आहे, पण जर पाणी कमी प्यायले गेले आणि तरीही वारंवार युरीनला  जावं लागत असेल, तर या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
 
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची युरीन येण्याची परिस्थिती वेगळी असते. तरीही एका निरोगी व्यक्तीला  दिवसातून 4 ते 10 वेळा कधीही युरीनला जावे लागू  शकत. टॉयलेटला जाण्यासाठी किती वेळ लागतो हे वय, औषधोपचार, मधुमेह, मूत्राशयाचा आकार यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. तर, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरच्या आठवड्यात वारंवार युरीनला जाणे सामान्य आहे. 
 
वारंवार शौचास जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मूत्राशय(युरिनरी ब्लेडर) )अतिक्रियाशील असणे आहे . त्यामुळे वारंवार युरीनला जावे लागते, मूत्राशयाची लघवी गोळा करण्याची क्षमता कमी झाल्यास किंवा दाब वाढल्यास थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही युरीन फार लवकर येते व काही वेळा ते धरून ठेवणे फार कठीण होऊन बसते.
 
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने 
मधुमेहामध्ये पुन्हा पुन्हा युरीन  येत राहते. विशेषत: टाईप-2 मधुमेह असलेल्यांना खूप त्रास होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की हा त्रास वाढतो. या वेळी  युरीन करताना थोडी जळजळ देखील जाणवू शकते. 
 
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
जर  युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर या समस्येचा सामना करावा लागू शकतो. या अवस्थेत वारंवार युरीन येण्याबरोबरच करताना जळजळ होते आणि कधीकधी वेदनाही होतात. 
 
किडनी इन्फेक्शन 
कमी पाणी पिण्याचा किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. किडनीचा संसर्ग झाला तरी पुन्हा पुन्हा युरीन येत राहते. प्रत्येक वेळी जेव्हा युरीनला जाता तेव्हा जळजळ देखील वाढते, त्यामुळे काही समस्या आढळल्यास, नक्कीच चाचणी करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान मुलाला सर्दी-खोकला होत असेल तर हे घरगुती उपाय अवलंबवा