Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यासाठी उत्तम मशरूम, रोज खाल्ल्याने होतील हे आश्चर्यकारक फायदे

Mushrooms
, मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (15:00 IST)
मशरूम जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मशरूममध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात, जी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
 
व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, तांबे, लोह आणि सेलेनियम हे मशरूममध्ये आढळतात. याचे सेवन केेेेेेेल्या वजन नियंत्रित करता येतं. शिवाय स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे मशरूम खाल्ल्याने अनेक फायदे आहेत-
 
मशरूम खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅस या सारख्या समस्यांवर फायदा होईल. मशरूममध्ये कार्बोहायड्रेट गुणधर्म आढळतात. जे पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर असू शकतात.
 
मशरूम खाल्ल्याने अतिरिक्त लठ्ठपणा रोखण्यासाठी मदत होते. यात प्रोटीओमचे प्रमाण जास्त असतंं ज्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि वजन कमी करणे सोपं जातं .
 
उच्च पोषक तत्वांचे गुणधर्म मशरूममध्ये आढळल्याने हृदय मजबूत होते. याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
 
मशरूममध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आढळतात.
 
मशरूम हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याने आहारात याचा समावेश करा. याचे सेवन भाज्यांसोबत, सॅलडमध्ये किंवा इतर पदार्थांसोबत करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Childhood Cancer Day : लहान मुलांनाही कर्करोगाचा आजार होतो, जाणून घ्या लक्षणे