Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या पाच कारणांसाठी, त्वचेकरिता परफ्यूम घातक आहे

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2024 (16:01 IST)
जर तुम्हाला देखील सतत परफ्यूम लावण्याची सवय असले तर जाणून घ्या परफ्यूम मुळे त्वचेला होणारे नुकसान. परफ्यूम आजच्या काळात आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक बनला आहे. आपण शरीराला घामाचा वास येऊ नये म्हणून आपण परफ्यूम वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की परफ्यूम तुमच्या त्वचेसाठी किती घातक ठरू शकतो. 
 
परफ्यूम मध्ये अनेक प्रकारच्या तत्वांचा समावेश असतो तसेच केमिकल असते जे आपल्या त्वचेसाठी घातक असते. चला तर जाणून घेऊ या त्वचेला परफ्यूममुळे होणारे नुकसान.
 
1. त्वचा ऍलर्जी- परफ्यूम मध्ये उपयोग केले जाणारे अनेक तत्व असे असतात ज्यामुळे त्वचेला रिएक्शन होऊ शकते. त्वचेची जळजळ होऊ शकते. 
 
2. त्वचा कोरडी पडते- 
परफ्यूम मध्ये असलेले अल्कोहोल आणि इतर अनेक केमिकल्समुळे  आपल्या त्वचेला कोरडेपणा आणि रुक्षता येऊ शकते. ज्यामुळे त्वचा खराब होऊ शकते व त्वचेला क्रॅक जाऊ शकतात. 
 
3. त्वचेची जळजळ- परफ्यूम मध्ये असलेले काही केमिकल्स आपल्या त्वचेला नुकसान करू शकतात. ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. 
 
4. घातक केमिकल्स- परफ्यूम मध्ये उपयोग केले जाणारे केमिकल्स जसे की, पॅराबेन्स, फ्लोराईड, फार्मलडिहाइड आणि प्रोपिलीन ग्लाइकोल आपल्या त्वचेला नुकसान करू शकतात. हे केमिकल्स त्वचेला अधिक संवेदनशील बनवू शकतात. 
 
5. सूर्याच्या रेडिएशनचे प्रभाव- काही परफ्यूम मध्ये उपयोग केले जाणारे केमिकल्स सूर्याच्या रेडीएशनच्या संपर्कामध्ये आल्याने त्वचेला अधिक प्रभावित करू शकतात. ज्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. 
 
परफ्यूमचा उपयोग करतांना सावधानी बाळगावी. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर योग्य परफ्यूम निवडावा ज्यामध्ये केमिकल कमी असतील. तुम्ही अश्या परफ्यूमचा उपयोग करू शकतात जो नैसर्गिक किंवा ऑर्गेनिक असेल. जो त्वचेसाठी सुरक्षित असेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

चिकन कटलेट रेसिपी

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

हिवाळ्यात शरीराच्या या 4 अवयवांवर तूप लावा, तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतील

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Winters : जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय ताबडतोब करून पहा

पुढील लेख
Show comments