Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीळदार स्नायूंसाठी...

Webdunia
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (09:45 IST)
स्नायूंना पीळदार बनवण्याचं तुमचंही स्वप्न आहे का? सेलिब्रिटींचे पीळदार स्नायू, सिक्स पॅक अॅब्ज बघून असंच काहीतरी आपणही करावं, असं वाटून जातं. 
 
यासाठी नेमकं काय करावं हे मात्र कळत नाही. त्यातच अनेकांना जीममध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्याघरी व्यायाम करून तंदुरूस्त शरीर घडवू शकता. या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
* बळकट स्नायू घडवण्यासाठी व्यायाम करायला हवा. स्नायूंच्या बळकटीसाठी सर्वात सोपा व्यायाम म्हणजे धावणं. धावल्याने संपूर्ण शरीराचा व्यायामहोतो. शरीर बळकट व्हायला मदत होते. दररोज क्वॅट्‌स केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात. पुश अप्स केल्याने हात आणि छातीचे स्नायू बळकट होतील. क्रंचेस केल्याने पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळेल. यासोबत लेग ड्रॉप, साइड प्लँकसारख्या व्यायामप्रकारांनी स्नायू बळकट करता येतील.
* दररोज अर्धा तास ब्रिक्स वॉकिंग करा किंवा धावा.
* क्वॅट्‌स करण्यासाठी सरळ उभे राहा. दोन्ही हात समोरच्या बाजूला सरळ रेषेत ठेवा. गुडघे वाकवा. खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा. आता श्वसनावर लक्ष केंद्रित करून मूळ स्थितीत या. 10 ते 15 मिनिटं हा व्यायाम करा.
* पुश अप्ससाठी सुरूवातीला वॉर्म अप करा. आता पोटावर झोपा. दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर टेकवा. शरीर वर उचला, पुन्हा खाली न्या. असं 30 वेळा करा.
* क्रंचेस करण्यासाठी जमिनीवर सरळ झोपा. आता दोन्ही हात कानांच्या मागे ठेवा. पाय दुमडून घ्या. आता शरीराचा पाठीपर्यंतचा भाग वर उचला. पुन्हा खाली न्या. असं 30 वेळा करा.
* यासोबतच आहारविहारावर लक्ष केंद्रित करून तुम्ही स्नायूंना बळकटी देऊ शकता. यासाठी फिटनेस ट्रेनरची मदत घेता येईल.
 चिन्मय प्रभू

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

पुढील लेख
Show comments