Dharma Sangrah

उन्हापासून बचाव करण्यासाठी हे करा...।

Webdunia
summer
उन्हाळा चांगलाच वाढलाय. या दिवसात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाचा त्रास होण्याची डिहायड्रेशनची शक्यता असते. योग्य आहारासोबत भरपूर पाणी प्यायला हवं. अतिनील किरणांपासून बचाव करण्याचे उपायही केले पाहिजे. 
 
* पुरेसं पाणी प्या. दिवसभरात किमान दोन लीटर पाणी प्यायला हवं. बाहेर असताना नारळ पाणी, फळांचे रस, लिंबू पाणी यांचं सेवन करत राहा. 
 
* एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं सनस्क्रीन वापरा. यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून संरक्षण देणारी क्रीम्स विकत घ्या. गॉगल, टोपी घाला. 
 
* ताजी फळं आणि भाज्या यांचं सेवन करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होईल. आहारात टोमॅटो, काकडीचा समावेश करा. यामुळे शरीरातली पाण्याची कमतरता भरून निघेल. 
 
* मद्य तसंच सोड्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. उन्हात फिरून घरी आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्यामुळे रक्तप्रवाह सुधारायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात मळमळल्यासारखं वाटतं, त्वचा काळवंडते, पुळ्या येतात. हे टाळण्यासाठी दररोज दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ  करा. 
 
* उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन तसंच लिननचे कपडे वापरा. गडद रंगाचे कपडे टाळा. हलक्या रंगाचे कपडे वापरा. यामुळे  उन्हा‍चा त्रास होणार नाही. 
 
* दुपारी बारा ते तीनदरम्यान उन्हात फिरणं टाळा. या काळात उन्हाची तीव्रता प्रचंड असते. बाहेरची कामं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा. डोकेदुखी, मळमळ, चक्कर असा त्रास जाणवू  लागला तर तातडीने डॉक्टरांकडे जा. पाणी प्या. कुणी चक्कर येऊन पडलं तर अंगावर थंड पाणी शिंपडा, सावलीत झोपवा आणि डॉक्टरांकडे न्या. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments