* सकाळ-संध्याकाळ नियमित मधाचं सेवन केल्यास पोटातील कृमी नाहिशा होतात. डोळ्यांमध्ये नियमितपणे मध घालत राहिल्यास दृष्टी सुधारते तसेच डोळ्याचे विकार दूर होतात. साधा सर्दी खोकला असेल तर मधाचं चाटण घेतल्यानं आराम मिळतो.
* सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. या दिवसात अंगावरपुटकुळ्या उठण्याचा त्रास संभवतो. हे टाळण्यासाठी टाल्कम पावडरचा वापर करावा. या दिवसात डोक्याची त्वचा खाजते. हे शॅम्पूच्या अॅलर्जीमुळे त्याचप्रमाणे वातावरणातील बदलामुळे संभवतं. यासाठी केस धुतल्यावर रगडून पुसा. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि खाज दूर होते.
* व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास ज्यूस अथवा पाणी घ्यावं. सॉलिड फूड घेतल्यास चालताना पोट दुखण्याचा त्रास होतो. सांध्यामध्ये वेदना जाणवत असल्यास कॅल्शियमची मात्रा वाढवा.