Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केसगळतीवर कांद्याने आणा नियंत्रण

केसगळतीवर कांद्याने आणा नियंत्रण
कांद्याचा वापर केसांच्या सौंदर्यवृद्धीसाठीही करता येतो. कांद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक जाणून घेऊ या... 
* दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर ऑलिव्ह ऑईल मिसळा. आठवड्यातून दोन वेळा हे मि‍श्रण केसांच्या मुळांना आणि स्कॅल्पला लावा. यामुळे केस गळणं कमी होईल त्याचप्रमाणे केसांची वेगाने वाढ होईल. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण रात्री केसांना लावा आणि सकाळी धुवून टाका. केसांची वाढ होण्यास मदत होईल. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर मध घाला. केसांना लावा. तासाभरान धुवून टाका. यामुळेही केस दाट आणि लांब होतील. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून केसांवर लावा. तासाभराने धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल आणि केस मऊ होतील. 
 
* अर्धा कप कांद्याच्या रसात 7 ते 8 कढीपत्त्याची पानं वाटून घाला. चमचाभर दही घाला. या मिश्रणाने स्कॅल्पवर मसाज करा. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर आंबट दही आणि लिंबाचा रस घाला. याने स्कॅल्पवर मसाज करा. अर्ध्या तासाने धुवा. केस बळकट होतील. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात चमचाभर बदामाचं तेल घाला. ते रात्रभर केसांना लावून ठेवा. सकाळी धुवून टाका. केस मुलायम आणि चमकदार होतील. 
 
* दोन चमचे कांद्याच्या रसात अंड्याचा पांढरा भाग मिसळा. याने स्कॅल्पवर मसाज करा. तासाभराने धुवून टाका. यामुळे केस वाढतील व केसगळती देखील कमी होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोपाळकाला : जन्माष्टमी विशेष