Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Healthy Food : पोषणयुक्त हे स्वस्त फळ घ्या,आणि निरोगी राहा

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (18:08 IST)
काळ बदलत आहे आणि महागाई वाढतच आहे.बऱ्याचवेळा आपल्या शरीराला आवश्यक असून देखील काही वस्तू महाग असल्यामुळे आपण खात नाही.आणि त्या वस्तू स्वस्त होण्याची वाट बघतो. परंतु असे काही स्वस्त फळ देखील आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर पौष्टीक घटक आणि व्हिटॅमिन असतात.चला तर मग कोणते असे 6 फळ आहे ज्यांच्या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात हे जाणून घ्या.   
 


1 आवळा- आवळा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.100 ग्रॅम आवळ्यात 0.05 ग्रॅम प्रोटीन,50 मि.ली.ग्रॅम कॅल्शियम,9.00 मिग्रॅ कॅरोटीन आणि 600 मिलीग्राम. व्हिटॅमिन सी आढळतं.
 
 

2 पेरू- याला जामफळ म्हणून देखील ओळखतात.या मध्ये 0.10 ग्रॅम प्रोटीन,9.00 ग्रॅम कार्बोहायड्रेट,50.मि.ली.ग्रॅम कॅल्शियम आणि 15 मिग्रॅ.व्हिटॅमिन सी आढळतं.
 


3 संत्री -हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत मानला जातो.या मध्ये 1 ग्रॅम प्रोटीन,
12.20 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 200 मिली. ग्रॅम कॅरोटीन, 0.10 ग्रॅम, .40 मिग्रॅ लोह, 41.00 मिग्रॅ कॅल्शियम, 0.10 मि.ली. ग्रॅम थायमिन आणि 50.00 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतं.
 
 

4 पपई- पपई हे पचनासाठी उत्तम फळ आहे. पपई खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात.या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.हे बिघडलेल्या पचन क्रियेला सुरळीत करण्याचे काम करतो.या सह व्हिटॅमिन सी,नियासिन, मॅग्नेशियम, कॅरोटीन, फोलेट,फायबर, कॉपर, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट देखील मुबलक प्रमाणात आढळतात.
 

5 केळी-केळी हे ऊर्जा वाढविण्यासाठी सर्वात चांगले फळ आहे. जर पोट ठीक नसल्यास आणि उष्माघात झाल्यास केळी खालली जाते.या मुळे पाचक प्रणाली सुधारते.अशक्तपणा जाणवत असल्यास देखील केळीचे सेवन केले जाते.केळी मध्ये व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते.या मध्ये  व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी 6, राइबोफ्लेविन,थायमिन देखील असते.केळीमध्ये 1.3 टक्के प्रोटीन, सुमारे 64 टक्के पाणी आणि 25 टक्के कार्बोहायड्रेट असते.सकाळी न्याहारीत 1 ग्लास दूध आणि 1 केळी खाल्ल्याने वजन वाढते.
 

6 कलिंगड -कलिंगड हे उन्हाळ्यात खालले जाणारे फळ आहे.या मध्ये लायकोपिन नावाचे पदार्थ असते .जे त्वचेला उजळण्यात मदत करतो.या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आहे.व्हिटॅमिन ए हे डोळ्यांसाठी सर्वोत्कृष्ट आहे. कलिंगडाच्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता चांगली होते.कलिंगडात 12.5 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते.11.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 1.5 ग्रॅम सोडियम आढळतं.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments