Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weight Loss Tips: सकाळी उठल्यानंतर ही 3 कामे करा, लठ्ठपणा कमी होईल

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (11:27 IST)
Weight Loss Tips आपण सकाळी उठून आपल्या दिवसाची सुरुवात ज्या प्रकारे करतो तसेच आपल्याला दिवसभर जाणवतं. आपण आपल्या दिवशाची सुरुवात निरोगीपणे करावी. ज्याने वजन कमी करण्यात मदत होते. सकाळी आपण ज्याप्रकारे आहार घेतो, जी कामे करतो त्याचा प्रभाव दिवसभर राहतो. म्हणूनच सकाळी उठून भरपूर पाणी प्यावे, व्यायाम करावा असे म्हटले जाते. याने वजन नियंत्रणात राहतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार आवश्यक आहे. सोबतच हेल्दी रुटीन फॉलो करणे गरजेचं असतं. आज आम्ही आपल्याला अशा 3 गोष्टी सांगत आाहोत ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. -
 
सकाळी गरम पाणी प्यावं- वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय टाका. सकाळी गरम पाणी प्यायल्याने पोट साफ होत आणि मेटाबॉलिज्म सुरुळीत काम करतं. आयुर्वेदात देखील उल्लेख करण्यात येतं की सकाळी 2 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर पूर्ण दिवस ऊर्जावान राहतं. उन्हाळ्यात देखील कोमट पाण्यानेच दिवशाची सुरुवात केली पाहिजे. आपण यात मध मिसळून देखील पिऊ शकता. याने वजन कमी होण्यात मदत होते आणि शरीर निरोगी राहतं.
 
सकाळी थोडा वेळ व्यायाम करा- लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळी व्यायाम केल्याने जमा झालेली चरबी कमी होते आणि तुम्ही लवकर स्लिम होतात. तर 
सकाळच्या सवयीमध्ये तुम्ही व्यायाम किंवा योगाचा समावेश केला पाहिजे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी व्यायाम केल्याने चयापचय वाढतो आणि आजार दूर राहतात.
 
सकाळी आरोग्यदायी पदार्थ खा- तुम्ही असा नाश्ता केला पाहिजे ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असेल. तुमच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये योग्य प्रमाणात प्रथिने आणि फायबर घाला. उच्च प्रथिने आणि
 फायबर युक्त अन्न खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये अंडी, दूध, ड्रायफ्रूट्स, स्प्राउट्स, ब्राऊन ब्रेड, शेक, स्मूदी यांचा समावेश करू शकता.
 हे चयापचय सुधारते आणि कॅलरी बर्न करण्यास देखील मदत करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो का? ही कारणे असू शकतात

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

लघू कथा : गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक ठरू शकते, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments