होळी मध्ये रंग खेळल्याने श्वासाचा त्रास होत असल्यास काही उपाय करून आपण या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.
1 दिवसाची सुरुवात काढा घेऊन करा-
या दिवशी एक कप गरम काढा पिऊन घ्या. या मुळे फुफ्फुसात रंग जाणार नाही. श्वास घ्यायला काहीच त्रास होणार नाही. आपण काढाच्या ऐवजी आल्याचा चहा देखील घेऊ शकता.
2 पुदिना आणि व्हिटॅमिन सीयुक्त आहार-
रंगाच्या वासामुळे श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर आपण न्याहारीत पुदिनाच्या पानाचा वापर करू शकता. व्हिटॅमिन सी चा वापर केल्याने फुफ्फुस निरोगी राहतात. फुफ्फुसाला संसर्ग आणि श्वासाच्या त्रासापासून दूर ठेवतात. या साठी आपण आहारात संत्री, लिंबू वापरू शकता.
3 लवंगा वापरा-
रंग खेळायला जाण्यापूर्वी एक किंवा दोन लवंगा खाऊन किंवा जिभे खाली ठेवून संसर्गा पासून वाचू शकता.
रंग खेळल्यावर-
रंग खेळून आल्यावर आल्याचा चहा किंवा काढ्याचा सेवन करा. संध्याकाळी जेवल्यानंतर एखादे फळ खावे. सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसाच्या त्रासाला दूर केले जाऊ शकते.