Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यायामानंतर खाज येत असल्यास

Webdunia
मंगळवार, 3 मार्च 2020 (16:01 IST)
खाज येण्याच्या समस्येला प्रुराईटस देखील म्हटले जाते. व्यायामादरम्यान खाज आल्याने त्वचेच्या पेशींना 
त्रास होतो किंवा इरिटेशन होते. सर्वसाधारणपणे अचानक तापमानात झालेले बदल, संसर्ग किंवा सौंदर्यप्रसाधनांची प्रतिक्रिया यामुळे हे होते. काही व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती कमजोर असल्यास ही लक्षणे 
दिसतात. अशाच प्रकारे जेव्हा आपण वेगात चालतो तेव्हा किंवा थंड जागेवरून गरम जागी जातो आणि थोडे श्रम करतो तेव्हा खाज येऊ शकते.
 
शरीरातील नसांमध्ये प्रुरिसेप्टर्स असतात. जेव्हा वातावरणात अचानक बदल होतो किंवा त्वचेवर कोणतीही रासायनिक प्रतिक्रिया दिसते तेव्हा हे प्रुरिसेप्टर्स कार्यान्वित होतात आणि मेंदू आणि मणका यांना संकेत 
पाठवतात. त्या संकेतांऐवजी मेंदू शरीरात अशा प्रकारच्या रसायनांची निर्मिती सुरू करतो जी या शारीरिक 
अवस्थेशी निपटण्यासाठी आवश्यक असते. शरीराची ही प्रतिक्रिया समजण्यासाठीच खाज येण्याची समस्या सुरू होते. शरीरांतर्गत रसायनांमुळेही पित्ताची समस्या निर्माण होते.
 
खाज कशी दूर करावी?
- व्यायामादरम्यान किंवा वेगाने चालताना किंवा अतिश्रम केल्यास शरीराला खाज येत असल्यास व्यायाम आणि श्रमाचे काम ताबडतोब थांबवा. एखाद्या उष्ण जागी असाल तर थंड जागी जाऊन थांबा. अशा परिस्थितीत हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घातले असतील तर तेही काढून टाका आणि शरीराचे तापमान सर्वसामान्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न करा. सतत खाज येत असेल तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.
 
थंडीमुळे होणार्‍या पित्ताने वैतागला असाल तर थंड पाण्याचा शेक घ्या. त्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि हिस्टामिन या रसायनांचे अतिर्रित वहन थांबवण्यास मदत करते. त्याचबरोबर पित्तामध्ये खाज येत असेल तर त्यावर उपाय म्हणून अर्धा कप दलिया पाण्याच्या टबात टाकून त्याने स्नान करावे.
 
याखेरीज एका वाटीत 2 चमचे बेकिंग सोडा घ्यावा आणि त्यात पुरेसे पाणी मिसळावे. ही पेस्ट करून खाज येणार्‍या जागी लावावी तसेच जिथे पित्त उठले आहे त्यावरही लावावे.
 
डॉ. संतोष काळे 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

फक्त 60 दिवसात 6 आसने करून पोटाची चरबी कमी करा

प्रेरणादायी कथा : स्वामी विवेकानंदांची कथा-भीतीचा सामना करा

झटपट बनणारा ब्रेकफास्ट Egg Fried Rice रेसिपी

आरोग्यदायी भोपळा-पनीर पराठा रेसिपी

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

पुढील लेख