Marathi Biodata Maker

Health Tips -युरीन करताना वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे आजाराचे लक्षण होऊ शकतात

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (23:13 IST)
युरीन करताना वेदना जाणवत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील काही गंभीर आहेत. त्यांच्याबद्दल ताबडतोब जाणून घेणे आणि त्यांच्यावर उपचार करणे महत्वाचे आहे जेणेकरून कोणताही रोग पुढे वाढू नये.
 
साधारणपणे, प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी युरीन  करताना वेदना होतात. अशा परिस्थितींकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब डॉक्टरकडे जावे. हे संसर्ग किंवा लैंगिक संक्रमित रोगामुळे देखील होऊ शकते. औषधे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.युरीन  करताना वेदना होण्याचे कारण काय आहे, हे कोणते आजाराचे लक्षण असू शकतात ते जाणून घेऊया.
 
1 युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन-
युरीन करताना वेदना होणं हे UTI चे मुख्य लक्षण आहे. हे मूत्रमार्गात जळजळ झाल्यामुळे असू शकते. हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होऊ शकते. युरेथ्रा,  ब्लॅडर इत्यादीसारख्या युरीनशी संबंधित अवयवांमध्ये जळजळ होत असली तरीही ही स्थिती सामान्य आहे.
 
2 एसटीडी-
जर संभोगाच्या वेळी शरीरात कोणताही आजार किंवा संसर्ग झाला तर हे देखील युरीन करताना वेदना होण्याचे मुख्य कारण असू शकते.
 
3 प्रोस्टेटायटिस-
जर प्रोस्टेट सारख्या अवयवात जळजळ होत असेल तर या अवस्थेला प्रोस्टेटायटिस म्हणतात आणि त्यामुळे युरीन करताना वेदना होतात. त्यात जळजळ देखील होऊ शकते.
 
4 सिस्टायटिस -
या स्थितीत, ब्लॅडरच्या लाईनींग मध्ये  जळजळ होते. याला पेनफुल ब्लॅडर सिंड्रोम असेही म्हणतात. यात  ब्लॅडर आणि पेल्विक क्षेत्रातील वेदना आणि कडकपणा देखील समाविष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये, रेडिएशन थेरपीमुळे  ब्लॅडर आणि मूत्रमार्गात वेदना देखील जाणवू शकतात.
 
5 युरेथ्रायटिस-
म्हणजे युरेथ्रात जळजळ. हे बर्याचदा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. या स्थितीतही युरीन करताना वेदना जाणवतात आणि वारंवार युरीन करावी लागते.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नाक आणि कान टोचताना या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात दम्याशी लढण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करा

लग्नात वधूला गिफ्ट देण्यासाठी आयडिया

नैतिक कथा : दोन शेळ्यांची गोष्ट

पायांमध्ये सूज, वेदना किंवा जळजळ, ही उच्च कोलेस्ट्रॉलची ५ लक्षणे

पुढील लेख