Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 11 January 2025
webdunia

मुलांना स्वच्छतेच्या 10 चांगल्या सवयी लावा

मुलांना स्वच्छतेच्या 10 चांगल्या सवयी लावा
, सोमवार, 30 जानेवारी 2023 (15:36 IST)
असं  म्हणतात की मुलं मोठ्यांचे बघून अनुसरणं करतात. त्यांच्या सवयी, बोलणे पद्धती विचार करणे  इत्यादी. मुलांसाठी त्यांचे पालक त्यांचा आदर्श असतात. अडचणी आल्यावर पालकच मुलांना शिकवतात आणि मदत करतात. जसं जसं मुलं मोठे होतात ते पालकांचे अनुकरण करतात. मुलांच्या चांगल्या घडण मध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांना चांगल्या गोष्टी शिकवणे आणि त्यांची सवय लावणे देखील महत्त्वाचे आहे. काही चांगल्या सवयी ज्या मुलांमध्ये असाव्यात जाणून घेऊ या. मुलाला स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी आणि त्यांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लावाव्यात.
 
1हात धुणे-मुलांना बाहेरून आल्यावर किंवा खेळून आल्यावर जेवण्याच्या पूर्वी हात धुवायला शिकवा. हात न धुतल्याने आजारी होऊ शकतो असे त्याला समजावून सांगा. जेवण्यापूर्वी हात धुण्याची चांगली सवय त्याला लावा .
2 दात घासणे- दररोज सकाळी उठल्यावर दात घासण्याची सवय त्याला लावा. दात न घासल्याने दात त्यात कीड लागून दात खराब होऊ शकतात. दररोज दोन वेळा ब्रश करण्याची चांगली सवय लावा. 
 
3 पायाची काळजी घेणे- हातांप्रमाणेच, तुमच्या मुलाला पाय स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करा. जरी तुमचे मुल बहुतेक वेळा मोजे घालत असले तरी, बंद पायांमधील ओलावा विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशीला जन्म देऊ शकते. पायात संसर्ग होऊ नये या साठी त्याला बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ करायला सांगा. 
 
4 नियमित आंघोळ करणे - आंघोळ केल्याने त्यांचे आरोग्य कसे राहते आणि ते आजार कसे टाळू शकतात.अंघोळ न केल्याने शरीरात रोग होतात या साठी दररोज अंघोळ करण्याची सवय त्याला लावा.
 
5 नखे कापणे- नखांवर बसलेल्या घाणीमध्ये जीवाणू असतात जे तोंड, नाक किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि विविध रोगांना जन्म देतात. मुलांना नखे कापण्यासाठी सांगावे. 
 
6 नाक स्वच्छ करणे -नाकात बोट घालणे टाळा: ही सवय सामाजिकदृष्ट्या अत्यंत वाईट आणि अत्यंत अस्वच्छ मानली जाते. मुलाला समजावून सांगा की त्याने घरातील बाथरूममध्ये त्याचे नाक व्यवस्थित स्वच्छ करावे आणि त्यानंतर त्याचे हात साबणाने धुण्यास विसरू नका.
 
7 खोकताना तोंडावर हात लावणे-  मुलाला खोकताना किंवा शिंकताना तोंड रुमालाने झाकायला शिकवावे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास आजूबाजूला बॅक्टेरिया पसरू शकतात. रुमाल वापरल्याने तुमच्या मुलाला जंतू पसरण्यापासून प्रतिबंध होईल आणि त्याला वारंवार संसर्ग होणार नाही.या नाही त्याला शिंकताना किंवा खोकताना हातावर रुमाल ठेवायला सांगा. 
 
8 शौचालयाच्या सवयी लावणे - मानवी मलमूत्रातून अनेक रोग पसरतात आणि स्वच्छतेची योग्य काळजी न घेणारी मुले यामुळे आजारी पडतात. या साठी त्याला स्वच्छतेच्या सवयी मध्ये शौचालय जाण्याचे महत्व समजावून सांगा. 
 
9 केस विंचरणे - केसांना तेल लावून दररोज विंचरण्याची सवय लावा. जेणे करून केस स्वछ राहतील आणि त्यात उवा होणार नाही. 
 
10 वस्तू नीटनेटके जागेवर ठेवणे - आपल्या मुलाला वस्तू नीटनेटकेपणाने जागेवर ठेवण्याची सवय लावा. वाढत्या वयाच्या मुलांना स्वतःची  खोली नीट ठेव्याला शिकवा. स्वच्छता कशी ठेवायची हे लहानपणा पासूनच शिकवावे. जेणे करून त्यांना सवय लागल्यावर ते स्वतः स्वच्छता ठेवतील.वस्तुंना जागच्या जागी ठेवण्याची सवय लावा.
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Recipe Of The Day:गरम मसाला घरी बनवण्याच्या टिप्स