Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपले पाय मजबूत ठेवा, नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (12:10 IST)
▪️ आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.
▪️ आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.
▪️ प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.
▪️ दोन आठवडे तुमच्या पायांना  हालचाल  नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.
▪️ डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.
▪️ एकदा आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.  नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.
▪️ म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
▪️ आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.
▪️ आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.
▪️ गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.
▪️ मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.
▪️ मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.
▪️ मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.
▪️ तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?
▪️ पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.
▪️ दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.
▪️ अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.
▪️ जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.
▪️ वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.
 
▪️ जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.
▪️ तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते,  त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.
▪️ अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार. 
▪️ पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.
▪️ आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.
▪️ केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते. 
▪️ रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Constitution Day 2024 संविधान दिन कधी आणि का साजरा केला जातो?

झटपट बनणारे मुळ्याचे पराठे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय करा

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

पुढील लेख
Show comments