Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धाप लागण्याच्या समस्येने त्रासलेला आहात हे जाणून घ्या.

धाप लागण्याच्या समस्येने त्रासलेला आहात हे जाणून घ्या.
, सोमवार, 10 मे 2021 (21:37 IST)
आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, कुटूंबातील किंवा नातेवाईकांना धाप लागण्याची किंवा श्वास लागण्याची समस्या अनुभवताना पाहिले असेल. धाप किंवा श्वास लागणे म्हणजे ते घेण्यास अडचण होणं . ही समस्या खाली नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते. चला जाणून घेऊ या.
 
1 ज्या स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो आणि ज्या स्त्रिया अशक्तपणाने  ग्रस्त आहेत, म्हणजेच अशक्तपणाचा त्रास असतो. तर हे श्वास किंवा धाप लागण्याचे  मुख्य कारण असू शकत.
 
2 बऱ्याचदा लठ्ठ लोकांची तक्रार असते. की पायऱ्या चढल्यावर त्यांना धाप लागते. म्हणून लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास श्वासोच्छवासाची ही समस्या टाळता येऊ शकते.
 
3 श्वसनमार्गाच्या आणि त्याच्या शाखांमध्ये सूज येणे देखील धाप लागण्याच्या समस्येचे एक कारण आहे.
 
4 फुफ्फुसांशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली तरीही श्वास घेण्यात अडचण होऊ शकते. कधीकधी बाह्य ऑक्सिजन शोषण्याची  फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि थोडं चालल्यावर श्वास लागतो.
 
5 हृदयाशी संबंधित त्रास असणे देखील  धाप लागण्याचे हे एक कारण आहे. 
 
श्वासाचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींचे अनुसरण करा -
 
1 नियमित व्यायामाचा आपल्या दिनक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करा, आपण लहान वयातच व्यायामाचा जितका चांगला अवलंब कराल आपल्या साठी ते चांगले ठरेल.
 
2 थोड्या वेळ सूर्यप्रकाश घ्या आणि धुळीपासून दूर राहा. 
 
3 कोणत्याही परिस्थितीत लठ्ठपणा वाढू देऊ नका.
 
4 दररोज सुमारे 350 ग्रॅम सॅलॅड आणि 350 ग्रॅम फळांचे सेवन करा.प्रथिने भरपूर घ्या. पालेभाज्या नियमित घ्या. कोणत्याही प्रकारचे धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे टाळा आणि मद्यपान करू नका.
 
टीपः धाप लागण्याच्या त्रासात आपण खबरदारी घेण्याच्या व्यतिरिक्त  डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात ग्लिसरीनचे फायदे जाणून घ्या