Marathi Biodata Maker

आंबट फळ आमसूल

Webdunia
आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोक म आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. 
 
आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते.

चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. नेहमी वापरले तरी चालते. आमसूल हे पाचक असून अंगावर पित्त उठणे, मूळव्याध, मुरडा, संग्रहणी, दाह यामध्ये उपयोगी पडते.

आमसूल बारीक वाटून पाण्यात मिसळून वेलदोडे, जिरेपूड, साखर टाकून सरबत बनवता येते. तयार सरबतही बाजारात मिळते.

उन्हाळ्यात याचा नेहमी वापर करावा. आमसुलांच्या बियांपासून तेल काढतात. ते पांढरट व मेणासारखे घट्ट असते.

हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायास भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम करून लावतात. मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात.

मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास कोकम तेल खाण्यास देतात. कोकम तेल पौष्टिकही आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बॅचलर ऑफ बिझनेस फॉरेन ट्रेड करून करिअर बनवा

त्वचा उजळण्यासाठी घरी बनवा बदाम क्रीम

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांकडून आपण काय शिकू शकतो, या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास यश मिळेल

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर इंजीनियरिंग करून करिअर बनवा

पुढील लेख
Show comments