Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीटरुटचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Learn the 10 health benefits of beetroot
Webdunia
रविवार, 16 मे 2021 (15:21 IST)
उन्हाळा म्हणजे अधिक तापमान आणि बरेच त्रास. या हंगामात बीटचे सेवन एक रामबाण औषध मानले जाते. सॅलड,कोशिंबीर आणि ज्यूसमध्ये वापरले जाणारे लाल बीटरूट आरोग्यासाठी तसेच सौंदर्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
बीटरूटचे 10 सर्वोत्तम फायदे येथे जाणून घ्या
 
1 हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी बीटरूट हे अत्यंत फायदेशीर आहे. नियमितपणे बीट खाल्ल्याने किंवा बीटचा रस घेतल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यात अत्यंत उपयुक्त ठरेल.
 
2 रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बीटरूट एक रामबाण उपाय आहे. नियमितपणे घेतल्यास आपण रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक गंभीर आजारांना टाळू शकता.
 
3 व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरीन, आयोडीन, आयरन आणि नैसर्गिक साखर या घटकाने समृद्ध बीटरूट बऱ्याच वर्षापर्यंत फायदे देते.
 
4 केसांची गळती किंवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या बीटरूटच्या नियमित सेवनने बऱ्या केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, बीटचा रस केसांना डाय करण्यासाठी  म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याचे कोणतेही दुष्परिणाम  होणार नाहीत.
 
5 बीटरूट चे सेवन केल्याने आपण आपली तग धरण्याची क्षमता वाढवू शकता. नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. लवकर थकवा येऊ देत नाही. आणि आपण जास्तीचे व्यायाम देखील करू शकता.
 
6 नियमितपणे बीटचा रस घेतल्यास आपण आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता. एवढेच नव्हे  तर आपल्याला तरूण दिसण्यात देखील मदत करत. हे अँटीऑक्सिडेंटने समृद्ध आहे आणि तणावापासून मुक्त करतं.
 
7 महिलांना बीटरूटचे नियमित सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील आयरन ची कमतरता दूर करण्यात मदत करते, जे बहुतेक स्त्रियांमध्ये असते.
 
8 सरत्या वयामुळे आपल्यात स्कॅक्रीयता ची कमतरता होत असेल तर दररोज 1 ग्लास बीटरुटचे रस प्यायल्याने ही समस्या दूर होते. 
 
9 बीटरूट मध्ये नायट्रेटचे प्रमाण मुबलक असतात जे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचे विसरणं टिकवून ठेवण्यास उपयुक्त आहे. 
 
10 बीटाची पाने पाण्यात उकळवून घ्या. मेंदी बरोबर मिसळून केसांना लावा. केसांच्या मुळापासून टोका पर्यंत लावल्यावर अर्धा तास तसेच ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून 3 ते 4 वेळा असं केल्याने केसांची गळती कमी होते.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

आवळा बियाणे त्वचेला चमकदार बनवण्यापासून ते केसांपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहेत

केमिकलशिवाय पूर्णपणे नैसर्गिक, कच्च्या पपईला पिकवण्यासाठी या ५ देशी ट्रिक अवलंबवा

लघु कथा : रंगीबेरंगी ढग

ज्योतिबा फुले यांच्याबद्दल विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तर

केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

पुढील लेख
Show comments