लिंबू पाण्याला देशी कोल्डड्रिंक म्हटले तर काही चुकीचे नाही. प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि खनिजांची समृद्ध असलेले हे पेय आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित बरेच फायदे देणारे आहे. चला लिंबू पाण्याच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊ या.
1 लिंबू हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहे. याव्यतिरिक्त, त्यात थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी -6, फोलेट आणि व्हिटॅमिन-ई कमी प्रमाणात आढळते. यामुळे घशात खवखव होणे, बद्धकोष्ठता, मूत्रपिंड आणि हिरड्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो. रक्तदाब आणि तणाव देखील कमी करते. त्वचा निरोगी करण्यासह लिव्हर साठी देखील हे चांगले आहे.
2 पचन क्रिया, वजन संतुलित करण्यास आणि कर्करोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लिंबू पाणी मदतगार आहे. या मध्ये खनिजे, आयरन, मॅग्नेशियम, फास्फोरस, केल्शियम,पोटॅशियम आणि जिंक आढळतात.
3 किडनी स्टोन- किडनी स्टोन किंवा मुतखडा झाले असेल तर लिंबू पाणी घेतल्याने मुतखडा शरीरातून बाहेर निघून जातो. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर रिहायड्रेट होण्यात मदत मिळते. लघवी पातळ करण्यात हे प्रभावी आहे. मुतखडा होण्याचा धोका कमी होतो.
4 मधुमेह -मधुमेह असल्यास याचे सेवन केल्याने साखरेची पातळी गंभीर पातळीवर न वाढवता शरीराला रिहायड्रेट करत आणि शरीराला ऊर्जा देतो.
5 बद्ध कोष्ठता - बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू घालून प्यावं. बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.
6 रोग प्रतिकारक प्रणाली - लिंबू पाणी हे बायोफ्लाव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि फायटोन्यूट्रिएंटचे एक चांगले स्त्रोत आहे जी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत. या मध्ये असलेले आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजांमुळे ते शरीराची उर्जा पातळी वाढविण्यात मदत करत.
7 घसा खवखवणे - घसा खवखवत असल्यास लिंबू पाणी कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
8 वजन- दररोज सकाळी मधासह कोमट पाणी प्यायल्याने जास्तीचे वाढते वजन नियंत्रणात ठेवता येत.
9 हिरड्यांचा त्रास ‑हिरड्यात वेदना होत असेल तर लिंबू पाणी प्यायल्याने आराम मिळतो. लिंबू पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्याने चांगले परिणाम मिळतात.
10 - ऍसिडिटी आणि संधिवात- लिंबू पाण्याचे सेवन केल्याने संधिवात आणि ऍसिडिटीमध्ये देखील आराम मिळतो. पचनाचा ,गॅस चा त्रास असणाऱ्यांनी नियमाने लिंबू पाण्याचे सेवन करावे.