Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
, रविवार, 20 जून 2021 (18:17 IST)
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना कालावधीचा उद्रेक खूप मोठा आहे.अशा परिस्थितीत अधिकाधिक फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.कारण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास आपण लवकरच कोरोनाला बळी पडू शकता. फळे आणि भाज्यां मधून आवश्यक पौष्टिक घटक मिळतात.या मुळे शरीराचे रक्षण धोकादायक आजारांपासून होतात.प्रत्येक फळ आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात.बऱ्याच वेळा काही लोक त्यामधील पोषक घटकांची माहिती नसल्याने त्याचे योग्य प्रकारे सेवन करत नाही.चला तर मग माहिती घेऊ या कोणते फळ आणि भाज्या खाव्यात जेणे करून आरोग्य चांगले राहील आणि महाग नसतील.
 
1 व्हिटॅमिन ए -त्वचा,डोळे,आणि शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए चांगला स्रोत आहे.व्हिटॅमिन ए च्या सेवन केल्याने डोळ्याच्या आजारात आराम मिळतो,हे आपल्याला गाजर,सोयाबीन,बीट,टोमॅटो,हिरव्या पालेभाज्या, आंबा,पपई मध्ये मुबलक प्रमाणात आढळत. 
 

2 व्हिटॅमिन बी -व्हिटॅमिन बी मध्ये तर व्हिटॅमिन्स देखील असतात जसे की रायबोफ्लोबीन,निकोटिनिक एसिड, फॉलीक एसिड,व्हिटॅमिन बी-12.याच्या कमतरतेमुळे वजन कमी होणं,भूक न लागणे,बेरीबेरी सारखे त्रास उदभवतात.याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण पान कोबी,पातीचा कांदा,गाजर,सॅलड,संत्री,लिंबू आवर्जून खावे.
 

3 व्हिटॅमिन सी- व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास किरकोळ आजार होऊ लागतात.जसे दाताचे दुखणे, हिरड्यातून रक्त येणे,स्कर्व्हीचा आजार,रोग प्रतिकारक शक्ती कमी होणं,व्हिटॅमिन सी अनेक फळात आणि भाज्यांत आढळत.फळांमध्ये संत्री,मोसम्बी,द्राक्ष,खाऊ शकता.भाज्यांमध्ये अंकुरलेले मूग,चणा,हिरवी आणि लाल मिरची,पालक,मोहरीची भाजी,बटाटे,टोमॅटो,लिंबूत आढळते.
 

4 व्हिटॅमिन डी -- व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्य, हाडांचा कमकुवतपणा, झोपेची कमतरता होते.व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास,सूर्यप्रकाश घेण्याचा सल्ला दिला जातो. यासह व्हिटॅमिन डी समृद्ध फळे आणि भाज्यांचे ही सेवन केले पाहिजे.एक कप संत्र्याचे ज्यूस प्यायल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होते .संत्र्याचे ज्यूस हे हाडांना बळकट करत.संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी,फोलेट आणि पोटेशियम मुबलक प्रमाणत असते.दूध,मशरूम देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करतात.
 

5 कॅल्शियम- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात कमकुवत होतात. अशा परिस्थितीत पालक, दूध, गूळ, मटार, शेंगदाणे,शिंगाडा,सूर्यफुलाच्या बिया, संत्री, दलिया, लवंग, काळीमिरी,आंबा, जायफळ,नाचणी, बाजरी, आवळा या गोष्टींचे सेवन केल्याने केल्शियम ची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते. 
 

6 कार्बोहायड्रेट -याची पुर्णता शरीरात असल्यास शरीरात पुरेशा प्रमाणात कॅलरी आणि ताकद असते. मटार, केळी, रताळे,बटाट्यात कार्बोहायड्रेट असत .
 

7 प्रोटीन- हे मानवाच्या शरीराच्या वाढीस आणि देखरेखीसाठी महत्त्वाचे आहे.शरीरात  पाण्याच्या कमतरते नंतर प्रोटीन आवश्यक घटक आहे.आपल्या शरीरात 18 ते 20 टक्के प्रोटीन चे प्रमाण असते.याच्या कमतरतेमुळे स्नायूत वेदना होणे,रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे,अशक्तपणा जाणवणे,केस आणि नखांवर परिणाम होते.हे पेरू,हरभरे ,वाटाणे, मूग,सोयाबीन,शेंगदाणे,आलुबुखारा,गावरान चणा,राजमा,फ्लॉवर किंवा फुल कोबी ,शेवगाच्या शेंगा मध्ये प्रामुख्याने आढळतं.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या