Dharma Sangrah

हार्टअटॅक टाळण्यासाठी उपाय

Webdunia
शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (09:09 IST)
आजकाल लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की आजच्या या धकाधकीच्या काळात त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळच नाही. जो बघा तो पळतच आहे आणि आपल्या सर्व गरज पूर्ण करण्याच्या मागे आपापल्यापरीने झटत आहे. प्रयत्नशील आहे. अश्या परिस्थितीत त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबातच वेळ नाही. परिणामी शरीर बऱ्याच रोगांनी ग्रस्त होतो. आपले हृदय कमकुवत होऊ लागत. आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका संभवतो. त्यासाठी सर्वात गरजेचं आहे आपल्या व्यस्त असलेल्या धावपळीच्या जीवनशैली मधून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. माणसाच्या अश्या बऱ्याच चुकीच्या सवयी असतात, जे हृदयाच्या रोगास कारणीभूत ठरतात. आपण जर का आपल्या या चुकीच्या सवयींना सोडलं आणि आपल्या हृदयाला बळकट बनवलं. तर या हृदयविकाराच्या झटका येण्याच्या धोक्याला बऱ्यापैकी कमी करू शकतो. 
 
* आपल्याला आपले हृदय बळकट करण्यासाठी धूम्रपान सोडणे महत्त्वाचे आहे - 
धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढणे आजकाल जणू फॅशनच बनले आहे. लोक आपल्या आरोग्याचा विचार न करता सिगारेट ओढण्याची सवय लावून घेतात, जी नंतर त्यांचा साठी हानिकारक ठरते. सिगारेट ओढल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजार होण्याचा धोका वाढतच नाही, तर हे हृदयविकाराच्या झटका होण्याचे जोखीम देखील वाढवतो. म्हणून आपल्या हृदयाला निरोगी आणि बळकट ठेवायचे असल्यास आजच धूम्रपान करणं थांबवा.
 
* वजन नियंत्रणात ठेवा - 
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन असल्यामुळे हृदय विकाराचा धोका वाढतो या व्यतिरिक्त इतरही अनेक रोग शरीराला वेढतात. म्हणून जर का आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी करावयाचे असल्यास, तर कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि दररोज व्यायाम करा.
 
* मद्यपान करू नये - 
जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे आरोग्यास हानिकारक असतं. या मुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी निगडित आजार होण्याचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्यानं हृदय कमकुवत होतं. म्हणून आपल्या हृदयाला बळकट करण्यासाठी मद्यपानाचे सेवन कमी करावं किंवा करूच नये. हे जास्त सोयीयस्कर आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
 
* दररोज किमान दोन लीटर पाणी प्यावं - 
पाणी आपल्या शरीरासाठी तेवढेच महत्त्वाचं आहे जेवढा महत्त्वाचा श्वास आहे. पाण्याच्या अभावामुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते. म्हणून दररोज किमान दोन लीटर पाणी प्यावं, जेणे करून शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये आणि आपण निरोगी राहाल, आपले हृदय बळकट होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

उच्च रक्तदाबासाठी आयुर्वेदिक उपचार काय आहे, औषधाशिवाय रक्तदाब कसा नियंत्रित कराल जाणून घ्या

हाडांना बळकट करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

अकबर-बिरबलची कहाणी : मोत्याचे झाड

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

पुढील लेख
Show comments