Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही फळे सोलून खाल्ल्याने त्यांची पौष्टिकता कमी होते, आपण ही चूक करता का?

Webdunia
बुधवार, 13 एप्रिल 2022 (20:59 IST)
शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी सर्व लोकांना रोजच्या आहारात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. हंगामी फळे हे पोषक घटकांनी समृद्ध असतात. काही फळांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सर्व प्रकारच्या गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. काही फळांचे बहुतेक पोषक त्यांच्या त्वचेत असतात, म्हणून ते सोलून खाल्ल्याने त्या पोषक तत्वांचा पूर्ण फायदा होऊ शकत नाही. तज्ज्ञांच्या मते फळांचे सेवन करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

फळांचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, ते योग्यरित्या आणि योग्य वेळी सेवन करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणती फळे सालासह खाणे अधिक फायदेशीर मानले जाते.आणि ते सोलून खाऊ नये.
 
1 सफरचंद- अनेकांना सफरचंद सोलून खाताना पाहिले असेल, तज्ञ याला चुकीची पद्धत  मानतात. सफरचंदाच्या मुख्य फळाप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही विविध प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात. त्यातून व्हिटॅमिन के , व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन सी , कैल्शिअम, आणि पोटेशियम मिळते. 
 
2 काकडी -काकडी सोलून न काढता खाणे विशेष फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. काकडीच्या गडद हिरव्या छटामध्ये बहुतेक अँटिऑक्सिडंट्स, अघुलनशील फायबर आणि पोटॅशियम असतात. त्यात व्हिटॅमिन-के चे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे ते स्वच्छ धुतल्यानंतर सोलून न काढता सेवन करावे. हायड्रेशन उत्तम राखण्यासाठी काकडी हे खूप उपयुक्त फळ आहे.
 
3 आंबा-कच्चा असो वा पिकलेला, आंबा सालासह खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आंब्याच्या सालीमध्ये मॅंगीफेरिन, नोरेथ्रिओल आणि रेझवेराट्रोल सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात जे फुफ्फुस, कोलन, स्तन, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील कर्करोग आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. म्हणून आंब्याचे सेवन सालीसह करावे.
 
4 संत्री- संत्र्याला व्हिटॅमिन-सी चा उत्तम स्रोत मानला जातो जो शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यास मदत करतो. व्हिटॅमिन-सी हे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन-सी फळाच्या सालीमध्ये आढळते. संत्र्याच्या सालीमध्ये रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील असते. हे आरोग्यास फायदेशीर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

उरलेल्या वरण-भातापासून बनवा स्वादिष्ट पकोडे रेसिपी

हिवाळ्यात दररोज प्या ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी चहा, त्याचे फायदे जाणून घ्या

इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सेस मध्ये करिअर करा

तुम्ही पालकाचा फेस पॅक वापरून पाहिला आहे का? हिवाळ्यात तुम्हाला काही मिनिटांत मिळेल नितळ आणि चमकदार त्वचा

हिवाळ्यात कॉर्न रॅब आरोग्य आणि चवीचा खजिना आहे, ते पिल्याने हे फायदे होतात, रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments