Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेक्स करा नि तब्बेतही राखा!

वेबदुनिया
सेक्स लाईफ छान असेल तर महिलांचे आरोग्यही छान रहाते, असे एका अभ्यासात पुढे आले आहे. त्यामुळे बेडरूममध्ये ज्या महिला 'संतुष्टी'चा अनुभव घेत असतील त्यांच्यात सकारात्मक उर्जा उत्पन्न होऊन त्यांची प्रकृतीही छान रहाते, असा या अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. डेली टेलिग्राफने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

२६ ते ६५ वयोगट असलेल्या २९५ महिलांचा अभ्यास करण्यात आला. यात महिन्यातून किमान दोनदा सेक्सचा अनुभव घेणार्‍या महिलांचा समावेश होता. त्याचवेळी महिनाभरात अनेकदा सेक्सचा अनुभव घेणार्‍या महिलाही यात सहभागी झाल्या होत्या. पण अनेकदा सेक्स करूनही लैंगिक आनंदाला त्या पारख्या झालेल्याचेही आढळले.

मोनाश विद्यापीठाच्या सोनिया डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या मते, या संशोधनातून लैंगिक समाधान आणि महिलांची प्रकृती यांचा काही संबंध आहे काय हे आम्हाला शोधायचे होते. शिवाय मासिक पाळी बंद होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर महिलांवर काय परिणाम होतो हेही जाणून घ्यायचे होते. त्यानुसार ज्या महिलांना लैंगिक सुख मिळत नव्हते, त्यांची प्रकृती तितकी चांगली रहात नसल्याचे आढळून आले.

महिलांच्या आरोग्यासंदर्भात विचार करताना त्यांच्या लैंगिक सौख्याचाही विचार करायला हवा, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले, असे त्या म्हणाल्या. लैंगिक सुखाचा अनुभव त्याच्या संख्येवरही अवलंबून नसल्याचे या अभ्यासात पुढे आले. महिन्यातून अनेकदा सेक्स करूनही काही महिला लैंगिक सुखाच्या बाबतीत समाधानी नसल्याचे आढळून आले. काही महिला मात्र कमीत कमी वेळा सेक्स करूनही आनंदित होत्या, असे या प्रकल्पाच्या सहअभ्यासक प्रा. सुझान डेव्हिस यांनी सांगितले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख