तज्ज्ञ सांगतात की आपल्या दैनंदिनीच्या वापरल्या आणि हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना देखील स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. लॅपटॉप, फोन, कार, बाईक्स, या सारख्या दररोज हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंना देखील सेनेटाइझ करायला हवंय.
गाडीच्या त्या जागेची स्वच्छता करायला हवी जेथे आपण सर्वात जास्त स्पर्श करतो. जसे कारचे स्टियरिंग व्हील, डोर हॅण्डल, गियर शिफ्टर, एसी बटण, रेडियो नॉब, आउटसाइड रियर व्यू मिरर, सेंटर कन्सोल, कप होल्डर्सही सतत स्वच्छ केले पाहिजे.
या महत्त्वाच्या वस्तू गाडीमध्ये ठेवाव्या
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी त्यांचा टिशू पेपर बॉक्स, हॅन्ड सॅनिटायझर आणि सॅनेटरी वाईप्स ठेवाव्यात.कार मध्ये बसताना आणि कारमधून बाहेर पडताना ताबडतोब हाताने स्वच्छ करावे.
कारची जागा अशी जागा आहे जिथे व्हायरस बऱ्याच काळी टिकून राहतो. चालक आणि प्रवासी सतत संपर्कात असतात म्हणूनच कारची सीट स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छता करण्यापूर्वी ओले कापड आणि सौम्य साबण वापरून सीट साफ करणे चांगले. त्याच प्रमाणे सीट बेल्ट आणि बटणेही स्वच्छ करावीत.
गाडीच्या सर्व काच स्वच्छ करावे. चिमूटभर पोटॅशियम परमॅंगनेट आणि दोन चमचे फार्मेलीन एक कप पाण्यामध्ये घाला. त्या मिश्रणाने खिडक्या आणि दारे स्वच्छ करा आणि कमीत कमी सहा तास दार आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या.
रुमालाचा 2 घड्या देखील मास्कचे काम करतात
मास्कचे पर्याय म्हणून आपण घरच्या घरी देखील मास्क तयार करू शकतो. रुमालाने किंवा सुती कापड्याचे 2 थर बनवून तोंडावर बांधल्यावर ते मास्क चे काम करतात. दररोज साबणाने हा रुमाल धुतल्यावर स्वच्छ पाण्यात काही थेंब डेटॉलची घालून त्या पाण्यात हे मास्क घालून मग वाळवून वापरावे.