Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात सामील करा हे पदार्थ

Webdunia
शुक्रवार, 12 जून 2020 (10:00 IST)
शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची  गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे त्रास सुरू होऊ शकतात. चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊया 
 
सर्वात आधी जाणून घ्या की लोहाची कमतरता असल्याची लक्षणे
थकवा येणे, सरत्या वयात चपळता कमी होणे स्वाभाविक असले तरी आपण थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवत असल्यास आरयनची कमी असल्याचे संकेत आहे. 
हिमोग्लोबिन रक्ताला लाल रंग देतं ज्यामुळे चेहऱ्याला रंग मिळतो. हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा फिकट आणि पिवळट दिसतो. डॉक्टर पण डोळ्याच्या खालील लाल भागाचीच तपासणी करतात.
पायऱ्या चढताना किंवा दैनंदिन काम करताना आपल्याला धाप लागत असल्यास लोहाची कमतरता असू शकते. 
पाय हालवते राहणे. मुलांना बऱ्याच वेळा असे न करण्यास ताकीद दिली जाते परंतू संशोधनात आढळून आले आहे की ज्या लोकांना लोहाची कमतरता असते त्यांचा स्वतःच्या पायांवर ताबा नसतो आणि त्यांचे पाय न कळतच हालू लागतात.
 
शरीरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असल्यावर आपले शरीर प्राधान्यक्रम ठरवतं. केस आणि नख एवढे महत्त्वाचे नाही जेवढे हृदय आणि मेंदू व्यवस्थितरीत्या काम करणे महत्त्वाचे आहे. म्हणून शरीर केस आणि नखांची काळजी घेणं थांबवत. 
 
शरीरामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. ते जाणून घ्या 
* गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. ह्याला आपण नियमाने देखील घेऊ शकता.
* अंकुरलेले कड धान्य घेतल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल, हे आपण दररोज सकाळी घेऊ शकता.
* डाळिंबात लोह चांगल्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमट दुधामध्ये 2 चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
* बिटाचे नियमाने सेवन केल्याने आपण आपल्या शरीरातील लोहच्या कमतरतेला दूर करू शकता. बीटरूटला आपण सॅलड रूपात किंवा रस किंवा सूप बनवून देखील पिऊ शकता.
* ओट्स आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. ह्याचा सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकता.
* आपल्या आहारामध्ये फळांचा पण समावेश करावा. ह्याच बरोबर नियमितपणाने ड्राय फ्रूट्स सेवन करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात बदाम घेण्या पासून देखील करू शकता. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
* आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करावं. यासाठी आपण लिंबाचे सेवन करू शकता. ह्याचा मुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेण्यास सुरू करू शकता. त्याच बरोबर सॅलड वर लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

संबंधित माहिती

Apple वापरकर्त्यांसाठी मोठा धोका निर्माण, भारतासह 91 देश टार्गेटवर

पुणे पोलिसांनी ट्रान्सजेंडर्सना सण, जन्म आणि ट्रॅफिक सिग्नलवर जबरदस्तीने पैसे मागण्यास बंदी घातली

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, रो-हाऊसमध्ये 8 आफ्रिकन मुली पकडल्या, 2 जणांना अटक

भाजपचा बडा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश!

शरद पवार भाजपशी हातमिळवणी करण्यास 50 टक्के तयार होते, प्रफुल्ल पटेल यांचा दावा

Marriage Tips : नातेवाईकांनी दिलेल्या पाच उपदेशांपासून सावधान, तुटू शकते नाते

उन्हाळ्यात रिकाम्या पोटी गिलॉय ज्यूस पिण्याचे 7 आश्चर्यकारक फायदे

उन्हाळ्यात बनवा लिंबाच्या मदतीने चविष्ट पदार्थ

मान दिसते लठ्ठ, तर करा या योगासनांचा अभ्यास

उन्हाळयात चांगला ब्रेकफास्ट आहे दलिया आणि ताक, जाणून घ्या फायदे

पुढील लेख
Show comments