Marathi Biodata Maker

वेळेवर रोज ब्रेकफास्ट न केल्यास वाढतो लठ्ठपणा

Webdunia
सकाळी ब्रेकफास्ट न करणे, हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते, असा इशारा एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे. ब्रेकफास्ट न करण्याच्या सवयीने शरीराचे अंतर्गत जैविक चक्र तर बिघडतेच, या शिवाय लठ्ठपणा वाढण्यासाठी मदत होते. शरीरासाठी वेळेवर ब्रेकफास्ट महत्त्वाचा असतो. मात्र तो न करण्याच्या सवीयीचा थेट संबंध लठ्ठपणा, टाईप-2 डायबिटीस आणि हृदय रोगाशी संबंधित आहे.
 
इस्त्रायलमधील तेल अविव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधनात असे आढळून आले की ब्रेकफास्ट न केल्याने जैविक चक्राशी संबंधित क्लॉक जीनवर त्याचा गंभीर परिणाम होतो. हाच जीन आरोग्यदायी लोक आणि डायबिटीज पीडित रूग्णांत अन्न खाल्यानंतर ग्लुकोज व इन्सुलिनच्या प्रतिक्रियांना नियंत्रित करतो.
 
डॅनिएल जॅगूबोविच यांनी सांगितले की ब्रेकफास्ट केल्याने क्लॉक जीन सक्रिय होतो आणि ग्लायसेमिकचे नियंत्रण अधिक प्रभावी बनते. सकाळी 9 वाजण्यापूर्वी ब्रेकफास्ट केल्याने मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा तर होतेच याशिवाय लठ्ठपणा कमी करण्यास व टाईप 2 डायबिटीज यासारख्या आजरांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

तुम्ही तासनतास इअरफोन वापरता का? कानाच्या आरोग्याविषयी माहितींकडे दुर्लक्ष करू नका

जोडीदार संशयी आहे का? नात्यातील विश्वास कसा वाढवावा सोपे मार्ग जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

पुढील लेख
Show comments