1. दररोज अगदी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनिटे तरी चाला. आणि ते ही उत्साहाने-आनंदाने. 2. दररोज किमान दहा मिनिटे स्वत:साठी द्या. दहा मिनिटे स्वत:च्याच सहवासात राहा. एका जागी शांत, स्वस्थ बसा. 3. दररोज 6 ते 8 तास शांत झोप घ्या. लक्षात ठेवा शांत झोप म्हणजे शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती. ती आवश्यकच आहे. 4. दररोज थोडा वेळ तरी खेऴा. शक्य असेल तर मुलांमध्ये मूल होऊन खेळा. 5. दररोज भरपूर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन हे लक्षात ठेवा. 6. दररोज थोडे तरी वाचन करा. 7. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, ज्यावर आपले नियंत्रण नाही त्यांची चिंता करणे सोडून द्या. 8. भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. त्यांनी मनःस्तापाशिवाय काहीही मिळत नाही. 9. दर वेळी तुम्हीच कसे जिंकणार? जीवनात हारजित हसतमुखाने स्वीकारायला शिका. 10. दररोज ठरावीक वेळी ध्यानधारणा करा, प्रार्थना करा. तो मन:शांतीचा मार्ग आहे.