rashifal-2026

Health Advice : जेवण केल्यांनंतर या 8 पदार्थांचे करू नये सेवन

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2024 (21:30 IST)
जेवण केल्यानंतर कधीही फळे सेवन करू नये, पाचनसंस्था बिघडू शकते. तसेच जेवण केल्यानंतर गोड सेवन करू नये यामुळे वजन वाढते. जेवण केल्यानंतर तुम्ही जर चाहा किंवा कॉफी सेवन केली तर एसिडिटी होऊ शकते. 
 
Things To Avoid After Eating: 
जेवण झाल्यानंतर देखील आपण काही प्रकारचे पदार्थ सेवन करतो. पोटभर जेवल्यानंतर देखील आपल्याला गोड खायला आवडते. तसेच कोल्ड्रिंक प्यायला आवडते. जेवण झाल्यानंतर काही पदार्थ खाऊ नये कारण हे पदार्थ जर तुम्ही सेवन केलत तर त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्या शरीरावर पडतो.याशिवाय तुम्हाला वजन वाढणे तसेच इतर आजारांशी सामना करावा लागतो. चला तर जाणून घ्या जेवण झाल्यांनंतर कोणते पदार्थ सेवन करणे टाळावे. 
 
1. फळे- जेवण केल्यानंतर फळे खाऊ नये. कारण हे जेवण झाल्यानंतर पचायला वेळ घेतात. फळांमध्ये फायबर असते. जे पोटाला जड बनवते आणि अनियमित पाचनास वाढवते. 
 
2. दूध- जेवण केल्यांनंतर दूध सेवन केल्यास पोटात गॅस होऊन पोटात भयंकर दुखू शकते. हा पदार्थ जलद गतीने पचणारा पदार्थ असल्यामुळे तुम्ही जर जेवणानंतर दूध सेवन केले तर हे तुमच्या पाचन शक्तीला प्रभावित करू शकते. 
 
3. थंड पाणी- जेवण झाल्यानंतर थंड पाणी पिणे पाचनाला अवरोधित करू शकते. थंड पाणी पाचनतंत्राला स्थिर ठेवत नाही. ज्यामुळे जेवण पचायला समस्या निर्माण होऊ शकते. 
 
4. चाहा आणि कॉफी- जेवण झाल्यानंतर चाहा किंवा कॉफी पिऊ नये. यांचे सेवन पाचनतंत्रसाठी घातक असते. यामुळे एसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच जेवण पचायला देखील समस्या येऊ शकते.  
 
5. तळलेले पदार्थ- जेवण झाल्यानंतर तळलेले पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ तेलकट असल्या कारणाने पाचन संस्था बिघडू शकते आणि आरोग्याला नुकसान देखील होऊ शकते. 
 
6. सोडा आणि कोला- जेवण झाल्यानंतर सोडा आणि कोला सेवन करू नये हे तुमच्या पोटात विष पसरवू शकते. तसेच पाचन संस्थेला प्रभावित करते. 
 
7. चिप्स आणि नमकीन- जेवण केल्यानंतर चिप्स आणि नमकीनचे सेवन टाळावे. यामध्ये अधिक मात्रमध्ये तेल आणि मीठ असते. जे पाचन संस्थेला प्रभावित करते. 
 
8. गोड- जेवण केल्यानंतर गोड पदार्थ टाळावे कारण हे आरोग्यासाठी घातक असतात. यांच्या सेवनाने वजन वाढते आणि मधुमेहाची समस्या निर्माण होते.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

जोडीदारासमोर पादणे हे खर्‍या रिलेशनशिपची लक्षण आहेत का?

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

सरकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू, पात्रता जाणून घ्या

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

पुढील लेख
Show comments