Festival Posters

लसीकरणानंतर या विशेष गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात

Webdunia
रविवार, 23 मे 2021 (12:03 IST)
लसीकरण हे सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा एकमेव उपाय आहे. शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचा एकच दावा आहे, लसीकरणाला घाबरू नका आणि लसीकरण करा. पण कोरोना लसीकरण दरम्यान लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत. ज्या आपल्या प्रतिकारशक्तीची पातळी देखील वाढवतात आणि या पासून होणाऱ्या साइड इफेक्ट्च्या वेदना कमी करतात .चला तर मग जाणून घेऊया आपल्या जेवणात कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात -
 
1 लसूण आणि कांदा -हे दोन्ही अन्नात भरपूर वापरले जाते. परंतु हे रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून खूप फायदेशीर आहे. लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, सेलेनियम, मॅंगनीज, तांबा, पोटॅशियम, फॉस्फरस आढळतात . तर, कांदा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे.
 
2 धान्य- प्रामुख्याने संपूर्ण धान्य अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले घटक लसीकरणाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. संपूर्ण धान्याव्यतिरिक्त ब्राऊन राईस, ज्वारी, ओट्स, नाचणी, सत्तू आणि पॉपकॉर्न देखील आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
 
3 पाणी- तज्ञांच्या म्हणण्यानुसार लसीच्या एक दिवस आधी आणि लसीनंतर काही दिवस भरपूर पाणी प्या. हे शरीर हायड्रेटेड ठेवेल आणि त्याचे दुष्परिणाम फारसे होणार नाही.
 
4 हळद- हळद ही एक आयुर्वेदिक औषध आहे. हे रामबाण औषध म्हणून कार्य करते. लसीकरणानंतर आपण रात्री हळदीचे दूध देखील पिऊ शकता.
 
 
5 ताजे फळे - लसीकरणानंतर  शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून अधिकाधिक फळे खा. उन्हाळ्याच्या हंगामात अशी अनेक फळे आहेत ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असतात. कलिंगड व्यतिरिक्त खरबूज, चिकू, आंबा, केळी, डाळिंबही खाऊ शकतात. ही फळे शरीराला सामर्थ्य देतात आणि पाण्याची कमतरता होऊ देत नाही.
 
6 हिरव्या भाज्या- हिरव्या भाज्यांमध्ये असलेले पोषक घटक रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून कार्य करतात. लसीकरणानंतर हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा. या मुळे आपल्याला शक्ती मिळेल   आणि लसीची वेदना कमी होईल.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यासाठी खूप फायदेशीर आरोग्यवर्धक आल्याचे सूप रेसिपी

हिवाळ्यात बनवा टोमॅटो आणि गाजराचे पौष्टिक सूप रेसिपी

कोणत्या चुकांमुळे UTI चा धोका वाढतो, कसे रोखायचे जाणून घ्या

UPSC ने NDA-I च्या 394 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली

हिवाळ्यात फक्त दहा रुपयांत घरी टोनर बनवा

पुढील लेख
Show comments