थंडीच्या दिवसांत गळ्यामध्ये खवखव आणि थकवा येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवेल. हे सूप सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या स्वयपाकघरात मिळून जातील चला रेसिपी लिहून घ्या
साहित्य
बीट- ३ ते ४
गाजर- २ ते ३
लेमन जेस्ट- २ चमचे
आले- ४ छोटे तुकडे
तूप- १ चमचा
पाणी- ५०० एमएल
हळद- १ चमचा
मीरे पूड- १ चमचा
बडिशोप- २ चमचे
मिठ- चवीनुसार
कृती
छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बीट आणि गाजर कापून घेणे आणि मिक्सर मध्ये बारीक करणे. एका कढईत तूप गरम करून त्यात आले आणि इतर मसाले टाकणे यानंतर याला २ मिनिट पर्यंत शिजवणे या मसाल्यांमध्ये बारीक केलेले बीट आणि गाजर पाण्यासोबत मिक्स करून टाकणे या सारण मध्ये मीठ टाकून याला १५ मिनिट शिजवणे यानंतर १ ते २ उकळी आल्यानंतर याला गाळून घेणे. मग सूपला परत कढाईमध्ये टाकून शिजवा. यानंतर याला लेमन जेस्ट आणि कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.