Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दृष्टी कमजोर असेल तर हे उपाय करून बघा ...

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2019 (10:25 IST)
आपली दृष्टी कमजोर असेल तर काही सोपे उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतील:
 
* आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया प्रत्येक तीन ते चार तासांमध्ये अमलात आणा. याने डोळ्यांना आराम मिळेल.
* नजर कमजोर असल्यास नियमित रूपाने डोळ्याचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.
* आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठेवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू   याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.
* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.
* गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. नियमित याचे सेवन केल्याने आपल्या फरक जाणवेल.
* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
* अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.
* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या 2 तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.
* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments