Dharma Sangrah

या पांढऱ्या गोष्टी वजन वाढवतात, लठ्ठपणा कमी करण्यासाठी या काळ्या गोष्टी खा

Webdunia
बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (09:25 IST)
वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहार दुरुस्त करावा लागेल कारण कोणत्याही व्यायामाचा किंवा योगाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आहारावर नियंत्रण असतो. वजन कमी करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. शिवाय आहारातून पांढऱ्या गोष्टी काढून टाकव्या त्याऐवजी तपकिरी किंवा काळ्या रंगाचा समावेश करावा. जसे की पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊन राईस खा, साखरेऐवजी ब्राऊन शुगर किंवा गूळ खावा. शिवाय तुम्ही ब्लॅक बेरी आणि ब्लॅक गार्लिक यांचाही आहारात समावेश करू शकता. हे सर्व वजन कमी करण्यास मदत करतील.
 
ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईस- वजन कमी करताना ही तुम्ही भात खाऊ शकता, पण तुमच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करावा. काळ्या तांदळात भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन्स असतं ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे ज्याने जळजळ कमी होते. काळ्या तांदळात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. याचे सेवन केल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हे तांदूळ खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं .
 
काळा लसूण- जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर काळा लसूण वापरा. याची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. काळा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
 
काळे अंजीर- काळ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब कमी होतो. काळ्या अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. काळे अंजीर खाल्ल्याने शरीराला कर्करोगाशी लढण्याची क्षमता मिळते असे देखील संशोधनांमध्ये आढळून आले आहेत.
 
ब्लॅक टी- ब्लॅक टी मध्ये आढळणारे पॉलीफेनॉल पेशींचे नुकसान कमी करतात. हे फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. सोबतच ब्लॅक टी वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते. ब्लॅक टी नियमित प्यायल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह कमी होतो.
 
ब्लॅक बेरी- ब्लॅक बेरीमध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात. याने मासिक पाळी नियमित होऊ शकते. शिवाय जळजळ कमी होते आणि त्वचा चांगली होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

अजब गावाची गजब परंपरा, वर सजला वधू प्रमाणे तर वधूने घातला वराचा पोशाख; यामागील रहस्य काय आहे?

तुमचा पण साबण लवकर वितळतो का? या सोप्या टिप्स वापरून पहा

कोणत्या 6 लोकांनी जिरे खाऊ नये? फायद्यांऐवजी गंभीर नुकसान करेल; तुम्ही ही चूक करु नका

दत्त जयंती विशेष नैवेद्य पाककृती घेवड्याची भाजी आणि गव्हाच्या पिठाचा शिरा

Dr. Rajendra Prasad Jayanti डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती

पुढील लेख
Show comments