Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त का आहे?

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (08:57 IST)
तुम्हाला नेहमीच अशक्त वाटतं का? थोड्याशा हालचालींनंतरही धाप लागते का किंवा सारखा दम लागतो का? सारखा थकवा येतोय म्हणून तुम्ही हालचाल टाळत असाल तर ही अॅनिमियाची चिन्हं आहेत.
जगभरात अॅनिमिया म्हणजे रक्तक्षयामुळे अनेक लोक आजारी आहेत. पण त्याची लक्षणं नक्की कधीपासून दिसू लागतात याची त्यांना कल्पना नसते.
 
अशक्तपणामुळे होणाऱ्या त्रासांची लोकांना फारच कमी माहिती असते. तसेच पुरुषांपेक्षा महिलांना रक्तक्षयाचा त्रास का होतो हे पाहाणं आवश्यक आहे.
 
अॅनिमिया म्हणजे काय?
आपले वय आणि लिंग यानुसार लाल रक्तपेशींमध्ये अपेक्षित असणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर त्याला अॅनिमिया असे म्हणतात. या स्थितीत शरीराला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही.
 
अॅनिमिया ही एक सामान्य आणि गंभीर जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. जगभरातील अॅनिमियाग्रस्तांपैकी बहुसंख्य मुले आणि स्त्रिया आहेत.
 
मुख्यत: लहान मुले, मासिक पाळी येणारे किशोरवयीन आणि महिला, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर स्त्रियांना याचा त्रास होतो. 
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात 6 ते 59 महिने वयोगटातील 40 टक्के मुले, 37 टक्के गरोदर महिला आणि 15 ते 49 वर्षे वयोगटातील 30 टक्के महिला अशक्त आहेत.
 
अॅनिमिया किंवा अशक्तपणा का येतो?
युनायटेड स्टेट्समधील प्रमुख वैद्यकीय संस्था मेयो क्लिनिकच्या मते, रक्तामध्ये पुरेसे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी नसतात तेव्हा ही स्थिती येते.
 
अशा लोकांमध्ये पुढील स्थिती असू शकते
 
शरीर पुरेसे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी तयार करत नाही किंवा
रक्तस्रावामुळे लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन बदलण्यापूर्वी जलद नुकसान होते किंवा
शरीर स्वतः लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन नष्ट करते
अस्थिमज्जाला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. पण पुरेशा लोहाशिवाय शरीर हिमोग्लोबिन किंवा रक्तपेशी व्यवस्थित तयार करू शकत नाही.
 
अशक्तपणा विविध कारणांमुळे होऊ शकतो. पण अशक्तपणाचे मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता. लोहाच्या कमतरतेचा अॅनिमिया जगभरात सर्वाधिक प्रमाणात आढळतो.
 
लोहाची कमतरता हे अॅनिमियाचे एक प्रमुख कारण असले तरी अॅनिमिया अनेक प्रकारचा असू शकतो.
 
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा
इन्फ्लमेशन म्हणजे दाहामुळे येणारा अशक्तपणा
ऍप्लास्टिक अॅनिमिया
अस्थिमज्जा अॅनिमिया
हेमोलाइटिक अॅनिमिया
सिकल सेल अॅनिमिया
रक्त तयार करण्यासाठी लोहाशिवाय शरीराला फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी-12 ची गरज असते.
 
अन्न यादीत व्हिटॅमिन बी-12 समृद्ध अन्न नसल्यास शरीरात व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अॅसिडची कमतरता निर्माण होते. परिणामी अॅनिमिया येऊ शकतो. 
 
तथापि, बरेच लोक व्हिटॅमिन बी -12 घेऊ शकत नाहीत. यामुळे व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया देखील होऊ शकतो.
 
जर लाल रक्तपेशी तुटल्या असतील तर हे देखील होऊ शकते. मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होणे, थायरॉईड ग्रंथीच्या समस्या, संधिवात, कर्करोग, क्षयरोग यासारखे जुनाट आजार अॅनिमियाचे कारण बनू शकतात.
 
थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, बोन मॅरो उत्पादन क्षमता कमी होणे यासारख्या असंख्य आजारांमुळे अॅनिमिया होऊ शकतो.
 
याबाबत विचारले असता, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे माजी प्रमुख मोहम्मद बिल्लाल आलम म्हणाले की, अॅनिमियाची कारणं आणि त्याचे गांभीर्य व्यक्तीनुसार बदलते.
 
याशिवाय, कुपोषण, पेप्टिक अल्सर, रोगप्रतिकारक शक्तीतील दोष, दीर्घकालीन वेदना औषधे आणि स्टिरॉइड्सच्या वापरामुळे पोटात अल्सर, जंत संसर्ग, मल किंवा मासिक रक्तस्त्राव आणि वारंवार गर्भधारणेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. अपघातात भरपूर रक्तस्त्राव होऊनही अॅनिमिया होऊ शकतो.
 
अॅनिमियाची लक्षणे काय आहेत?
शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास थकवा वाढतो. परिणामी, भूक कमी होते. हे प्रामुख्याने शरीरातील अॅनिमियाकडे लक्ष वेधतात.
 
युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार(एनएचएस( , अॅनिमियाची लक्षणे अशी आहेत:
 
शारीरिक कमजोरी, आळस आणि थकवा
धाप लागणे
हृदयावर अतिरिक्त दबाव जाणवणे आणि हृदय गती वाढणे
फिकट शरीर
मेयो क्लिनिकच्या वेबसाइटनुसार, अशक्तपणामुळे ऊर्जा कमी होणे, निस्तेज त्वचा, धाप लागणे, हात-पाय थंड पडणे, छातीत दुखणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात.
 
याशिवाय काही विशेष प्रकरणांमध्ये ताप, जुलाब किंवा कावीळ यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
 
पुरुषांपेक्षा महिलांना अॅनिमियाचा जास्त त्रास का होतो?
यूएस नॅशनल हार्ट, लंग आणि ब्लड इन्स्टिट्यूटनुसार, काही लोकांना अॅनिमिया होण्याचा धोका जास्त असतो. उदाहरणार्थ-
 
मासिक पाळी दरम्यान आणि गर्भधारणेदरम्यान
पुरेसे लोह आणि विशिष्ट जीवनसत्त्वे नसणे
काही औषधे घेणे आणि उपचारादरम्यान होणे
अनेक देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना अॅनिमियाचा जास्त त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांची शारीरिक वैशिष्ट्ये.
 
मासिक पाळीच्या परिणामी महिलांच्या शरीरातून दर महिन्याला रक्त वाहते. काही प्रकरणांमध्ये, पातळी खूप जास्त असते आणि कधीकधी ते नेहमीपेक्षा जास्त काळ टिकते. परिणामी, भरपूर रक्तस्त्राव होऊन अशक्तपणा होतो.
 
मुख्यतः मासिक पाळी, स्तनपान किंवा आईच्या दुधाची निर्मिती प्रक्रिया आणि गरोदर स्त्रियांना अशक्तपणा होण्याची शक्यता जास्त असते.
 
महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्रियांना मासिक पाळी येते, बाळंतपण होते, स्तनपानादरम्यान लोह कमी होते आणि बाळंतपणात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो,” प्रा. आलम यांनी सांगितले.
 
मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान लोह मोठ्या प्रमाणात कमी होते. या कारणास्तव महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरुषांपेक्षा 1.5 ग्रॅम कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
याशिवाय, प्रोफेसर आलम यांनी भारतीय उपखंडात अशक्तपणाचे दुसरे प्रमुख कारण म्हणून वर्म्स म्हणजेच जंत असल्याचं सांगतात.
 
बरेच लोक किमान स्वच्छता नीट पाळत नाहीत. जसे की हात धुणे किंवा जेवण्यापूर्वी हात स्वच्छ करण्याची सवय पाळत नाहीत. परिणामी, जंतूंच्या अळीची अंडी त्यांच्याद्वारे शरीरात प्रवेश करतात. पोटात राहणारे जंत जेव्हा रक्त शोषतात तेव्हा रक्तातील लोह संपुष्टात येते, परिणामी अशक्तपणा येतो.
 
अशक्तपणा- अॅनिमिया असल्यास कोणते अन्न खावे?
अशक्तपणा-अॅनिमिया टाळण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खावेत. चणे, पालक, बीन्स आणि बीन्स बिया, हिरवी केळी, फ्लॉवर, यकृत, समुद्री मासे, दूध, अंडी, खजूर, चिकन यकृत, गोमांस हे देखील लोहयुक्त पदार्थ आहेत.
 
लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरने समृद्ध, मनुके हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
 
व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ लोह शोषण्यास मदत करतात. दुसरीकडे, जर जेवणात लोहाची कमतरता असेल किंवा तुम्ही खूप चहा-कॉफी प्यायली तर लोह शोषण्यास अडथळा येतो.
 
तथापि, जर अन्नाद्वारे कमतरता पूर्ण होत नसेल तर पूरक आहार घेणे आवश्यक आहे. गरज भासल्यास रक्तही घेता येते, असे प्राध्यापक आलम यांनी सांगितले.
 
मात्र हे सर्व उपचार घेण्याआधी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली पाहिजे.तुम्‍हाला अॅनिमियाचा त्रास होत असल्‍यास, प्रथम तुम्‍हाला ते किती गंभीर आहे हे जाणून घेणे आवश्‍यक आहे. त्यामागील कारण शोधून त्यानुसार कार्यवाही करावी. अॅनिमियावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध चांगला आहे.
 
Published By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

रेबीज फक्त कुत्र्यांमुळेच होतो असे नाही तर या 4 प्राण्यांच्या चाव्याव्दारेही होतो, जाणून घ्या कसा टाळावा

या 3 कारणांमुळे मुल तोंडात बोट घालते, भुकेशिवाय इतरही कारणे असू शकतात

पूर्व रेल्वेत गट C आणि D साठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा

तुम्हीही जास्त वेळ उपाशी राहिल्यास तुमच्या शरीराला या 5 समस्यांना सामोरे जावे लागू शकते

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय करा

पुढील लेख