Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, इतके फायदे आहेत

फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, इतके फायदे आहेत
, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (13:18 IST)
फणसात असे बरेच पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह सारखे गुणधर्म असतात. या शिवाय ह्यात मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळतं. आज आम्ही आपल्याला फणसाच्या काही फायद्याबद्द सांगणार आहोत, याची माहिती मिळाल्यावर आपण फणस आवडीने खाऊ लागणार. फणस हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
 
1 डोळे आणि त्वचा - 
फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं जे डोळ्यांचा प्रकाश वाढवतो आणि त्वचेला व्यवस्थित ठेवतो.
 
2 रक्तदाब - 
या मध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि लोह आढळतं जे रक्तदाबासारखे गंभीर त्रासाला दूर करत आणि शरीरातील रक्त विसरणं वाढवतं.
 
3 तोंडात छाले झाले असल्यास -
ज्या लोकांना तोंडात वारंवार छाले होत असल्यास त्यांनी फणसाची कच्ची पानं चावून थुंकली पाहिजेत. या मुळे तोंडाचे छाले बरे होतात.
 
4 हृदय विकार - 
फणसात अजिबात कॅलरी नसते. हे हृदयच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतं.
 
5 मजबूत हाडे -
हाडांसाठी फणस खूप फायदेशीर मानले जाते. या मधील असलेले मॅग्नेशियम हाडांना बळकट करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त काळ मोबाइल दिल्यानं डोळ्यांवरच नव्हे तर मेंदूवर देखील प्रभाव पडतो