Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

जास्त काळ मोबाइल दिल्यानं डोळ्यांवरच नव्हे तर मेंदूवर देखील प्रभाव पडतो

Harmful Effects of Mobile Phones on Children
, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:56 IST)
सध्याच्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेस सुरू असल्यामुळे मुलांना मोबाइल हाताळण्याचा जणू बहाणाच मिळाला आहे. पण अशामुळे त्याला मोबाइल बघण्याची सवय लागली आहे. तसे बरेच मुलांची सवय असते की मोबाइल बघितल्या शिवाय जेवत सुद्धा नाही. आपल्या पाल्याला देखील अशी काही सवय असल्यास, किंवा आपले पाल्य देखील दिवसभर मोबाइलला चिटकलेले असतात का? जर होय, तर सावधगिरी बाळगा. हा लेख आपल्यासाठी कामी येईल. 
 
एका संशोधनात असे आढळून आले आहे की मोबाइलचा अत्यधिक वापर केवळ मुलांच्या डोळ्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील घातक आहे. तसेच मुलांनी शिकण्याची, समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता तसे नातं जुळवून घेण्याची क्षमता देखील कमकुवत होते. पालकांना मुलांना दिवसभरातून फक्त 2 तास मोबाइल वापरायला देण्याचे सांगितले आहे. 
 
संशोधनात आढळले आहे की दिवसभरातून तीन तासापेक्षा जास्त मोबाइल हाताळणारे मुलं उशिरा बोलणं शिकतात. त्यांना वाचायला, लिहायला आणि भाषा समजायला देखील अडचण येते. तसेच जे वयात आलेले मुलं तब्बल 5 ते 7 तास मोबाइलच्या पुढे असतात त्यांमध्ये दुःख, अस्वस्थता, जीवनापासून नैराश्य आणि आक्रमकताच्या तक्रारी प्रकर्षाने जाणवतात आणि या मध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता असू शकते.   
 
लठ्ठपणाचा धोका -
संशोधनात आढळून आले हे की मोबाइलचा अत्यधिक वापर मुलांमधील लठ्ठपणा वाढवतो. त्याचे कारण असे की मोबाइल बघून जेवणारे मुले अधिक कॅलरी घेतात. तर जे मुलं मोबाइलचा वापर 50 टक्के कमी करतात ते 25 टक्के कमी कॅलरी खातात.
 
झोपेची तक्रार जाणवते - 
संशोधनात आढळून आले आहे की मोबाइलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटॉनिन नावाच्या स्लिप हार्मोनच्या उत्पादनास अडथळा आणतो. यामुळे मुलांना झोप येण्याचा त्रास तर होतोच, तसे ते सकाळी उठल्यावर ताजे-तवाने देखील जाणवत नाही. अर्धवट झोप झाल्यामुळे त्यांचा स्मरणशक्तीवर तसेच त्यांचा तार्किक क्षमतेवर देखील वाईट परिणाम होतो. तज्ज्ञ सांगतात की मुलांनी झोपण्याचा किमान 2 तासापूर्वी पासूनच मोबाइल हाताळू नये.
 
डोक्यापासून ते कंबरेपर्यंत वेदना होणं -
संशोधनात आढळले आहे की तासंतास मोबाइल वापरणाऱ्या मुलांमध्ये डोकं, पाठ, कंबर आणि खांदे दुखीचा त्रास उद्भवतो. ह्याचे कारण म्हणजे मान वाकवल्याने त्याचा भार वाढतो आणि त्यामुळे पाठीचा कणा किंवा मणक्यावर अतिरिक्त दाब पडतो.
 
काळजीची बाब -
* आठ ते 12 वर्षापर्यंतची मुले दररोज चार ते सहा तास मोबाइल हाताळतात.
* वयात आलेले मुले मुली नऊ तास मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटर हाताळतात.
 
कोणी किती वापर करावा -
1 ते दीड वर्षाच्या मुलांना - 2 ते 3 मिनिटे, तेही फक्त व्हिडिओ कॉल पूर्ती मर्यादित असावा. पालकांना आपल्या मुलांना बाहेर खेळायला आणि वाचन - लिखाणासाठी प्रोत्साहित करावं.
 
18 ते 24 महिने - पालकांच्या निरीक्षणाखाली दिवसभरातून एक ते दीड तासच मोबाइल हाताळण्याची परवानगी असावी. मुलांना शैक्षणिक साहित्यापुरती मर्यादित असायला हवं.
 
2 ते 5 वर्षे - नृत्य गाण्याशी संबंधित व्हिडिओ बघण्याची आणि खेळ खेळण्याची परवानगी देऊ शकता. पण आठवड्यातील पहिले पाच दिवस फक्त एक तास आणि आठवड्यांचा शेवटी तीन तासांपेक्षा जास्त काळ मोबाइल वापरायला देऊ नये.
 
5 वर्ष पेक्षा जास्त - मोठ्या मुलांसाठी तर वेळ निश्चित करणं अवघडच असत. पण मुलांनी मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटरचा जास्त वापर केल्यामुळे त्यांचा शारीरिक हालचाली आणि शिकण्याची कला समजून घेण्यावर परिणाम होऊ लागत असल्यास तर ते फार घातक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बनवलेले मास्कचे 4 फायदे