Festival Posters

कोथिंबीरही गुणकारी

Webdunia
स्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत.

कोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी आहे. जळजळ होत असल्यास कोथिंबिरीचा एक किंवा दोन थेंब ताजा रस डोळ्यांमध्ये टाकल्याने आराम मिळतो.

ओल्या कोथिंबिरीबरोबरच धणेही तेवढेच उपयोगी आहेत. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. अतिसारावरही धण्याचा काढा करून प्यायल्याने उपयोग होतो.

गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा अधिक त्रास होतो तेव्हा १0 ग्रॅम खडीसाखर आणि २.५ ग्रॅम धणे पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्या कमी होण्यास मदत होते.

धणे मुखशुद्धीकारकही आहेत. पचनादी त्रास झाल्यास किंवा अजिर्णामुळे हैराण झाल्यास चहाच्या पावडरबरोबर धणे पूड वापरतात.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Sunday Born Baby Girl Names रविवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

जोधपुरचा अस्सल फेमस मिर्ची वडा, खाऊन मन भरणार नाही! ओरिजिनल रेसिपी ट्राय करा

Vasant Panchami Special Recipes वसंत पंचमी विशेष नैवेद्य पाककृती

Saturday Born Baby Boy Names शनिवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे

हिवाळ्यात या 5 गोष्टी खाऊ नका, शरीर आजारी होऊ शकते

पुढील लेख
Show comments