Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चक्कर येऊ लागल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा

चक्कर येऊ लागल्यास हे घरगुती उपाय अवलंबवा
, रविवार, 27 मार्च 2022 (16:09 IST)
बऱ्याच वेळा बराच काळ खाली बसून राहिल्यानंतर अचानक उभे राहिल्याने चक्कर येते. काही लोकांना असे जाणवते की बसताना किंवा चालताना त्यांचे डोके गरगरते, त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येते. अनेक वेळा उन्हाळ्यात कडक उन्हात चालतानाही चक्कर आल्यासारखं वाटतं.
 
दैनंदिन कामे करताना अधूनमधून चक्कर येणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जेव्हा हे आपल्या सोबत दररोज होत असेल तर ,तेव्हा ते गांभीर्याने घ्या, कारण हे शारीरिक कमजोरी, अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. बहुतेक लोक डोकं गरगरण्याच्या समस्येने त्रस्त असतात, ज्याला व्हर्टिगो म्हणतात. काही घरगुती उपायांनी आपण चक्कर येण्याच्या समस्येवरही मात करू शकता.
 
चक्कर येण्याचे काही कारणे-
 
* काही औषधांच्या सेवनामुळे चक्कर येऊ शकते
* न्यूरोलॉजिकल स्थिती जसे की पार्किन्सन रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस मुळे
* चिंता विकार
* शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी होणे.
* जास्त गरम होणे आणि निर्जलीकरण होणे.
* मायग्रेनचा त्रास असल्यास चक्कर येऊ शकते.
* मोशन सिकनेस.
 
चक्कर येण्यावर काही घरगुती उपाय-
1 आल्याचे सेवन करा : जर आपल्याला चक्कर येत असेल तर आल्याला आपल्या  आहाराचा भाग बनवा. आल्याचा चहा प्यायल्याने आराम मिळेल. काही लोकांना बस, कारमधून प्रवास करताना उलट्या किंवा चक्कर येण्याचा त्रास होतो, याला मोशन सिकनेस म्हणतात.  अँटिऑक्सिडेंट्स चे गुणधर्म असलेले आलं  अनेक समस्या दूर करते. तसेच, मोशन सिकनेस किंवा इतर कारणांमुळे चक्कर येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
 
2 तुळशीची पाने चघळणे : तुळशीची पाने औषधी गुणांनी समृद्ध असतात. चक्कर येण्याच्या वेळी तुळशीची काही पाने चावा, ज्यात अँटीइंफ्लिमेंटरी, अँटीऑक्सीडेंट इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात, याचे सेवन केल्याने आपल्याला खूप आराम मिळेल. तुळशीची पाने बारीक करून त्याचा रस पाण्यात मिसळून पिऊ शकता.
 
3 भरपूर द्रव पदार्थ घ्या : उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात चालल्याने खूप घाम येतो. शरीरात पुरेसे द्रव नसल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे चक्कर येणे, डोके फिरणे, डोळ्यां समोर अंधारी येणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. नारळपाणी, लिंबूपाणी, ज्यूस, बेल सरबत, सातू सरबत, कैरी पना  इत्यादी इतर उन्हाळी आरोग्यदायी पेये पिणे सुरू ठेवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वजन कमी करायचंय? प्रोटिन्स खाऊन वजन कमी होतं का?