Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हातपाय बधीर होतात?

Webdunia
गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (00:12 IST)
अनेकदा बसल्यावर किंवा उभारलवर आपल्या अवयवांना बधीरपणा येतो. का होत असावे असे? अवयव सुन्न होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अर्थात एखाद्या विकारामुळे किंवा शरीरात काही कमतरता असल्याने सुन्नपणा येत नाही. सर्वसाधारणपणे एकाच स्थितीत बसणे, उभे राहणे म्हणजे हालचाल न करता स्थिर राहिल्याने बधीरपणा किंवा सुन्नपणा येतो. बधीरपणाच्या या अवस्थेतजेव्हा त्या अवयवाची हालचाल करतो किंवा झटका देतो तेव्हा तो अवयव पूर्वस्थितीत येतो. मात्र अंग सुन्न का होते आणि त्यावर झटपट उपाय काय जाणून घेऊया. 
 
शरीराला बधीरपणा का? - शरीराचे अवयव सुन्न किंवा बधीर होणे ही सामान्य गोष्ट आहे. साधारपणे हात, पाय, खांदे यांच्यात बधीरपणा अधिक असतो. त्याचे कारण म्हणजे झोपताना, बसताना किंवा उभे राहिल्याने त्या विशिष्ट अवयवावर जास्त जोर पडतो. एकाच स्थितीत खूप जास्त वेळ काम करत राहिले, थांबले की त्या अवयवाचे स्नायू आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि शरीराला बधीरता येते. सर्वसाधारणपणे शरीरातील कोणत्याही भागाला होणार्‍या रक्तपुरवठ्यात काही खंड पडला की, अवयवांमध्ये बधीरपणा येतो. 
 
बधीरपणाची लक्षणे- शरीरातील कोणताही अवयव किंवा भाग सुन्न झाला की आपण सहजपणे असे म्हणतो की पायाला मुंग्या आल्या आहेत. आणि शरीराची हालचाल करताना तो अवयवच नाहीये असे वाटते किंवा त्याची जाणीव होत नाही. बधीरपणामुळे त्या अवयवाला मानसिक संकेत मिळत नाहीत. त्यामुळे बधीरपणा जावा, यासाठी जेव्हा अवयवांना झटका द्यायचा असतो तेव्हा ते अवयव हालतही नाहीत. सर्वसाधारणपणे बधीरपणा आल्याने शहारे येतात, पण वेदनाहोत नाहीत. 
 
उपाय - लसूण किंवा सुंठ : अवयवांना सातत्याने बधीरपणा येते असेल किंवा ते सातत्याने सुन्न होत असतील तर रोज सकाळी शौचविसर्जन केल्यानंतर सुंठीचा छोटा तुकडा किंवा लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. त्यामुळे अवयवांना बधीरपणा येण्यापासून बचाव होईल. सुंठ किंवा लसूण यांच्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. 
 
* पिंपळाचे पान : पिंपळ हे अतिगुणकारी झाड आहे. त्याच्या पानांत विविध अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. अवयव सुन्न होण्याची तक्रार जाणवत असेल तर पिंपळाची 3-4 ताजी पाने किंवा पारंब्या मोहरीच्या तेलाच टाकून ते शिजवून घ्या. अवयवांना मुंग्या येतील तेव्हा हे तेल चोळावे. 
 
* शुद्ध तूप : पायांना मुंग्या येण्याची समस्या भेडसावत असेल तर घाबरू नका. शुद्ध देशी तुपाचा वापरु करुन या समस्येवर त्वरीत उपाय करता येतील. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तूप मंद गॅसवर गरम करा. त्वचेचा सहन होईल इतपतच गरम करा आणि तळव्यांना लावा त्यामुळे पायांच्या बधीरपणाचा त्रास कमी होईल. त्याशिवाय पायाला भेगा पडण्याची समस्याही दूर होईल.
 
डॉ. मनोज शिंगाडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

पुढील लेख
Show comments