rashifal-2026

बहुउपयोगी बडीशेप

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2019 (15:14 IST)
मुखशुद्धीसाठी बडीशेपचा सर्रास वापर होतो. पचनासाठी म्हणूनही बडीशेप खाल्ली जायची. त्याचे गुणधर्म पाहू.
* रात्रभर पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप भिजत ठेवावी. सकाळी ते पाणी प्यावं. त्यामुळे लघवीचा दाह कमी होतो.
* गोड, उष्ण, कफवातनाशक गुणधर्माची बडीशेप सुगंधी, रुचकर आहे. 
* भोजनानंतर चिमूटभर बडीशेप तशीच किंवा विड्यात मिसळून खायची अनेक ठिकाणी पद्धत आहे.
* कोरडा खोकला किंवा तोंड आलं असेल तर बडीशेप चावून तोंडात धरावी.
* उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर त्याचा लेप लावावा.
* मासिक पाळीवेळी स्त्रियांना पोटदुखी होते. सकाळ, संध्याकाळ 1-1 चमचा बडीशेप खाल्ल्याने ती थांबते.
* बडीशेप खाल्ल्याने पोटातील मुरडा कमी होतो. 
* लहान मुलांना पोटदुखी, पोटफुगी, पातळ शौचास होत असेल तर बडीशेप भिजवलेले पाणी प्यावे.
* लहान मुलांना अजीर्ण, अपचनामुळे पोटात मुरडा मारतो. मुल रडू लागते. त्यावर ग्राईप वॉटर हे मुरडा थांबवणारे औषध द्यायची पद्धत आहे. यामध्ये बडीशेपचाअर्क असतो.
* एक चमचा बडीशेप पावडर, तेवढीच सुंठ पावडर गरम पाण्यासह रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शौचास चिकट आव पडायची थांबते. पचन सुधारते.
* बडीशेपपासून काढलेले तेल औषधात वापरतात. 
* तापातून उठलेल्या पेशंटच्या तोंडाला चव नसणं, अन्नावरची वासना उडणंया तक्रारी असतात. त्यांना बडीशेप वरचे वर कोमट पाण्यासह खायला द्यावी. भूक लागते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हरीण आणि सिंह

गणेश जयंती निमित्त बाप्पाला प्रिय असलेले पदार्थ नैवेद्यासाठी नक्कीच बनवू शकता

PM Modi Favourite Fruit: पंतप्रधान मोदींनी सीबकथॉर्न फळाचे कौतुक केले, हे खाण्याचे काय फायदे?

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

पुढील लेख
Show comments