Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशीच आवडलेली काही वाक्ये;

Webdunia
सोमवार, 3 नोव्हेंबर 2014 (15:49 IST)
. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..
 
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .
 
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
 
. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं..   
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
 
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
 
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰
. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
 
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
 
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
 
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
 
. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..
 
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
 
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..

 
. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
 
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..
 
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..
 
. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..
 
. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..
 
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..
 
. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
 
. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम..  
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
 
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
 
. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
 
. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
 
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
 
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली
तो विसरत नाही.. . ..

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments