Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : घरची आठवण

Webdunia
मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (15:33 IST)
एक अगदी निराश दिसणारा प्राणी त्या दिवशी एका साहेबी हॉटेलात शिरला. त्याचा चेहराच काय खांदेही साफ पडलेले होते आणि तो भकास दिसत होता. तो एका टेबलापाशी बसल्यावर तिथली वेट्रेस त्याच्याजवळ आली. 'मला दगडासारखी कठीण अशी दोन अंडी, दोन संपूर्णपणे कोळसे झालेले पावाचे तुकडे आणि थंडगार चहाचा एक कप घेऊन ये,' त्याने सांगितले.
 
त्या वेट्रेसने ही चमत्कारिक ऑर्डर ऐकून साहेबी पद्धतीप्रमाणे आपले खांदे उडवले, पण तरी करते काय? मुकाट्याने आत जाऊन ती सर्व वस्तू घेऊन आली. 'हं साहेब, आणखी काय पाहिजे?' तिने विचारले. 'आणखी काही नाही. आता तू फक्त माझ्यासमोर बस आणि माझ्या कपाळाशी कसली तरी कटकट कर सतत. माझं डोकं उठलं पाहिजे. काय समजलं!' आणि यावर ती वेट्रेस जेव्हा आश्‍चर्यचकित होऊन त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागली, तेव्हा त्याने सांगितले, 'प्लीज, मला घरची फार आठवण येतेय गं.'

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

Show comments