Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू:

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (11:09 IST)
कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू आपल्या वाट्याला आला तर.?
 
१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"
 
Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !" (तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)
 
२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..
"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"
 
Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)  ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)
 
३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- व्हाट इज बीफोर यू?
 
Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..) तो उमेदवार म्हणाला - टी ! (?) (चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )
 
४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली? या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे. 

Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)  उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )
 
५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
 
Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
 
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)
 
६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.? ‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’. उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं. "असं का.. हीच जागा का. ?"
 
Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.? त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.

तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments