Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Friends Jokes in Marathi मैत्री जोक्स

Friends Jokes in Marathi मैत्री जोक्स
, मंगळवार, 8 जून 2021 (12:37 IST)
एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
.
.
.
मित्राला दिलेली उधारी परत मिळत नाही..
आखिल भारतीय लगेच परत देतो संघटना !!! 
 
ःःःःःःःःःः
 
गण्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये?
पक्या: यार काल बायकोने दहा हजार साड्यांवर उडवलेत
गण्या: मग आज मूड ऑन कसा
पक्या: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 
 
ःःःःःःःःःः
 
चिंटू: लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.
मन्या:एकदम चूक. आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय लागली का सवय ?
 
याला म्हणतात कंट्रोल.
 
ःःःःःःःःःः
 
रुम‬ वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
.
.
.
जो पर्यंत ‪चहा‬ कढईत बनवायची वेळ येत नाही
 
ःःःःःःःःःः
 
फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड यातील फरक
 
मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल .. 
आणी खरा मित्र तो जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल 
आणी म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…
 
ःःःःःःःःःः
गण्या: अरेंज मॅरेज म्हणजे काय ?
बंड्या: सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या: आणी लव मॅरेज  म्हणजे काय ?
बंड्या: लव मॅरेज  म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो
फूस फूस … चाव ना मला ..चाव ..
 
ःःःःःःःःःः
 
गण्या: हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं…
पक्या: गप रे, काहीपण बोलतोस…
गण्या: अरे हो, तुला पहायचं का?
पक्या: दाखव…
गण्या कुत्र्याला म्हणतो, “सांग हा माझा कोण?”
कुत्रा बोलतो, “भाऊ… भाऊ… भाऊ….”
 
ःःःःःःःःःः
 
गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो,
जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही
.
.
.
.
कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर
 
ःःःःःःःःःः
 
गण्या – यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे?
 
.
.
.
.
पक्या – बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

HBD: शिल्पा शेट्टी हिने आपल्या करिअरची सुरुवात एका छोट्या जाहिरातीने केली, जाणून घ्या तिच्या वाढदिवशी 10 खास गोष्टी