एक गुरुजी लॉकडाऊन ड्युटी संपवून घरी परतत होते. वाटेत एक नदी होती! नदीला मोठा पूर आलेला!! पाणी ओसरे पर्यंत थांबण्या शिवाय गत्यंतर नव्हत.
गुरुजी नदीकाठी दगडावर बसले आणि फावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी पोरांना घरचा अभ्यास देऊ म्हणून त्यांनी त्यांच्या बॅगमधून पेन व कागद बाहेर काढला आणि अचानक… पेन त्यांच्या हातुन निसटला आणि पाण्यात बुडाला. गुरुजी अस्वस्थ झाले.
आजच सर्वेसाठी पाच रुपये देऊन पेन खरेदी केला होता. त्यांनी इकडे-तिकडे पाहिले, पाण्यात जाण्याचा प्रयत्न करायचे, आणि भीतीने बाहेर पडायचे. अगदी नवीन पेन होता, सोडणे योग्य नव्हते... गुरुजी अस्वस्थ.....
अचानक …….पाण्यात एक तीव्र लाट आली.
वरुण देव समोर प्रकट झाले!!
गुरुजी हक्के - बक्के..
देव आणि कु-हाडीची गोष्ट डोळ्यासमोर आली.
वरुण देव म्हणाले, "गुरुजन तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?
प्रमोशन, बदली, वेतनवाढ काय पाहीजे?....सांगा...
गुरुजी संकोचून म्हणाले, "स्वामी! आज सकाळी नवीन पेन विकत घेतला होता पूर्ण पाच रुपयाचा!
हे पाहा, माझ्याकडे त्याचे झाकण देखील आहे.
येथे दगडावर बसुन लिहीताना तो पाण्यात पडला.
देव म्हणाला, "एवढेच ना!"
मी आणतो. "
अस म्हणुन देवाने पाण्यात बुडी मारली!!
आणि सोन्याचा चमकदार पेन घेऊन बाहेर आले.
म्हणाले - हा तुमचा पेन आहे का?
गुरुजी म्हणाले - देवा, मी साधा गुरुजी.
सोन्याचा पेन कुठे नशीबात माझ्या, हा पेन माझा नाही.
देव म्हणाला - ठिक आहे आणि पुन्हा पाण्यात बुडी मारली...
यावेळी देवाने हिरे आणि रत्न जडीत पेन आणले.
तो म्हणाला - " घ्या आपला पेन."
गुरुजी म्हणाले - " प्रभु तुम्ही माझी चेष्टा का करता आहात?
असा अनमोल पेन आणि तोही माझा ...मी गरीब आहे प्रभु!
प्रभू म्हणाले, “काळजी करू नका आणि पुन्हा एकदा पाण्यात उड़ी मारली….!!
थोड्या वेळाने देव पाण्याबाहेर आले हातात खरा पेन!!
म्हणाले - हा आहे काय?
गुरुजी ओरडले - होय, हाच आहे.
प्रभु म्हणाले - तुमच्या प्रामाणिकपणाने माझे मन जिंकले.
तम्ही खूपच प्रामाणिक आहात.
हे तिन्ही पेन घ्या, तिन्ही तुमचे!
गुरुजी आनंदित होऊन घराकडे निघाले.
कथा अजून आहे मित्र हो.....
.
घरी आल्यावर गुरुजींनी बायकोला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि मौल्यवान पेन देखील दाखवीले.
बायकोला विश्वासच होईना...
काहीतरी नक्की लफडं आहे, असे बोलली.
बरेच स्पष्टीकरण देऊनही जेव्हा बायकोने ऐकले नाही म्हणून गुरुजी तीला घटनेच्या ठिकाणी घेऊन गेले.
दोघेही त्या दगडावर बसले,
सर्व कसे कसे घडले ते सांगू लागले.
तरीही बायको गुरुजींची उलट तपासणी घेत होती,
अचानक …….डुबूक डबुक !!! बायकोचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. गुरुजींच्या तर डोळ्यासमोर तारे नाचू लागले. हे काय झालं ! जोरात रडले.
अचानक तेव्हा पाण्यात उच्च लाटा वाढू लागल्या!!
नदीतुन साक्षात वरुण देव प्रकट झाले !
म्हणाले - काय रे काय झाले? का रडत आहात?
तर त्याने रडताना देवाला घडलेली सर्व कथा सांगितली.
देव म्हणाला - रडू नकोस. धैर्य ठेव. मी आता लगेच तुमच्या बायकोला बाहेर काढतो.
देव पाण्यात गेले आणि थोड्या वेळात कटरिना कैफला सोबत घेऊन बाहेर आले.
म्हणाले - ही तुझी बायको आहे का?
गुरुजींनी क्षणभर विचार केला, आणि ओरडले-होय, होय, हीच आहे.!!!
आता प्रभु चिडले... जोरदार ओरडुन म्हणाले - दुष्ट गुरुजन ....थांब मी तुला श्राप देतो.
गुरुजी म्हणाले - माफ करा प्रभु...माझा दोष नाही.
माझा हेतू प्रामाणिक आहे ..... जर मी हिला माझी नाही असे सांगितले असते तर आपण प्रियंका चोप्राला पुढच्या वेळेस आणले असतेस.....
आणि पुन्हा मी नकार दिला असता....तर तुम्ही माझ्या बायकोला घेऊन आला असता. मग प्रभु तुम्ही खुश होऊन मला म्हणाला असतास, जा ह्या तिन्ही तुझ्या...घेऊन जा !
आता तुम्ही मला सांगा देवा,
महागाईच्या या युगात.... कोरोनाच्या कहरात, दोन दोन महिने पगार थकलेले आहेत,
७ व्या वेतन आयोगाचे रोखीचे हप्ते पण मायबाप सरकारने एक वर्षासाठी गोठविले आहेत...
अश्या परिस्थितीत मी ह्या तिघीना कसे सांभाळु शकलो असतो?
परमेश्वरा, मी या तिन्हीचा भार वाहु शकणार नाही. क्षमा करा देवा.
म्हणुन मी विचार केला आणि एकट्या कटरीनाचाच स्विकार केला!
हे ऐकून प्रभूने त्याला त्रिवार नमस्कार केला अश्या काहीतरी लॉजिक वाल्या गोष्टी सांगा दर वेळी काय ते कोरोना ...कोरोना लावलंय.....!!