Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय मसाला डब्बा

Webdunia
भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही !
तिखटासारखे वडील...
थोडक्यातंच बस म्हणावेसे वाटणारे.. रंग-रुप-गुणानेच दरारा निर्माण करणारे... पण नक्कीच हवेहहवेसे  वाटणारे 
 
हळदीसारखी आई...
कुठेही जा.. आपली छाप सोडणारी.. रंगात रंगूनी सा-या रंग माझा हळवा... मरावे परी रंगापरी उरावे... अशी हवी हवीशी,आपली आई. 
 
जिरे-मोहरी म्हणजे भावंड...
कमी-जास्त प्रमाणात तडतडणारंच... चवीने भांडणारे... म्हणूनच याच्या उपास-बिन उपास अशा सोईस्कर वाटण्या करुन दिलेल्या... 
 
काळा मसाला म्हणजे दोन्हीही आजोळ कंपनी...
ब-या-वाईट घराणेशाहीच्या गोष्टींच सुवासिक चुर्ण...
जातील तिथे आदरयुक्त कौतुकास पात्रच ठरतात... 
 
मेथीचे आणि उडदाचे दाणे म्हणजे,एके काळचे जवळचे आणि आता जरा दुरावलेले खणखणीत नातलग.  
हे अधून-मधूनंच बरे असतात नसता अति परिचयात अवज्ञा ठरलेलीच यांची. 
 
आणि किसून उरलेल्या खोब-याचे तुकडे (काही कुजके पण) म्हणजे छोट्या गावातले काका,मामा लोक..
ह्यांच्या घरी यांचा किस पाडला जातो म्हणून हे आपल्या घरात येतात, भाचरांवर बारीक लक्ष ठेवतात आणि मग खाजगीत पालकांना सल्ले देतात... अण्णा... लक्ष ठेव बरं... पोरं याच वयात हातातून निसटतात. त्या जोश्याच्या पोराचं असंच... 
 
त्या कमरेतनंच मोडलेल्या मिरच्या म्हणजे शहरी आत्या आणि मावश्या...
मोडतील पण भाच्यांच पुरेपूर दिलोजानसे स्कैनिंग करतील... बेबीताई सांभाळ गं पोरीला...
अगं काय तिचं ते नखं वाढवणं, रोज शैम्पु वापरणं, आरश्यात बघणं... उद्या उजवायची आहे तिला.. लोकं लक्ष ठेवून असतात म्हटलं.  
 
आणि सर्वात शेवटी, मित्रमैत्रिणी म्हणजे बडीशेप....
एकमेकांना असा काय शेप देतील ना की सारी टेन्शन एकदम खल्लास   
             
हे सर्व लोकं एकेका वयात एकेकटे जिणं हराम करतील, पण एकत्रीतपणे येऊन जीवही तेवढाच लावतील...
आयुष्याला चटपटीत,घमघमीतही तेच बनवतील. 
 
भारतीय मसाला डब्बा चिरायु होवो ! 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments