Marathi Biodata Maker

मी माणूस घडवतोय

Webdunia
गुरूवार, 24 मे 2018 (10:32 IST)
एका गुरूकडे एक अभ्यागत बसले होते. 
 
काही शास्त्रचर्चा सुरू होती.
 
एक शिष्य आत आला. दार लावलं. पादत्राणं काढून ठेवली. गुरूंच्या समोर येऊन बसला.
 
गुरू थोडा वेळ शांत राहिले. मग अगदी मृदू स्वरात म्हणाले, "बेटा जा, दाराची आणि जोड्यांची माफी मागून ये."
 
शिष्य उठला, दारापाशी गेला, माफी मागितली, जोड्यांचीही माफी मागितली.
 
पाहुणे अचंबित झाले. म्हणाले, हा काय प्रकार? दाराची आणि जोड्यांची माफी?
 
गुरू म्हणाले, तो आला तेव्हा घुश्शात होता, त्याने दार जोराने आपटलं आणि जोडे रागाने भिरकावले होते. 
 
पाहुणे म्हणाले, पण म्हणून निर्जीव वस्तूंची माफी मागायची?
 
गुरू म्हणाले, निर्जीव वस्तूंवर राग काढता येतो, तर त्यांची माफी का नाही मागायची?
 
पाहुणे म्हणाले, पण, याच्या रागाचा किंवा माफीचा दरवाजावर किंवा जोड्यांवर काय परिणाम होणार?
 
गुरू म्हणाले, पण, मी कुठे दरवाजा किंवा जोडे घडवतोय.......... 
 
"मी माणूस घडवतोय."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

Funny प्या रे देश....... वासियो...

महाराष्ट्रातील अशी ५ प्राचीन मंदिरे, जिथे उन्हाळ्यातही जाणवतो कमालीचा थंडावा!

रोनित रॉयच्या नावाने महिलांची सायबर फसवणूक, अभिनेत्याने चाहत्यांना सावध केले

चिरंजीवींनीने त्यांच्या मेगा १५८ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली

मराठवाड्याचे वैभव संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण

पुढील लेख
Show comments