Festival Posters

होतं असं कधी कधी......

Webdunia
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...
 
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....
 
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...
 
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...
 
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...
 
टाळतो आपण कॉल करायचा....
 
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...
 
'तुझ्या ऑफिस बाहेर होतो...
भेटलो असतो...'
 
जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच... 
 
स्वतःला खोटं खोटं समजावत...!
 
*
 
कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली...
 
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...
 
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
 
'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 
 
पाकिटात हात जातो...
 
शंभराची नोट लागते हाती...
 
व्यवहार जागा घेतो ममतेची...
 
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
 
"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."
 
तो सुटका करतो आपली पेचातून...
 
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...
 
*
 
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
 
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
 
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी...
 
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
 
ती येते...
 
काम आटोपते...
 
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
 
चिवडा लाडू असतो त्यात...
 
"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."
 
'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...
 
*
 
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
 
आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर...
 
अंगात ताप असतो तिच्या...
 
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
 
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
 
दिवस उलटतात...
 
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
 
"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."
 
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
 
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.....
 
लाजत तिला फोन करतो...
 
"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."
 
ती बोलते...
 
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...
 
 
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
 
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
 
 
खरंच, 
होतं असं कधी कधी....!!!
 
***
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

रश्मिका मंदाना अभिनीत 'मायसा' या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

मुंबईतील या ठिकाणी नाताळाचा दिवस भव्य साजरा केला जातो; हे प्रसिद्ध चर्च नक्की एक्सप्लोर करा

पुढील लेख
Show comments