Marathi Biodata Maker

बघा जमल्यास विचार करुन…..

Webdunia
तलवारीची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कारटी ऊशिरा झोपली…
 
माहीत नाही शहाजीराजे कोण,जिजाऊ कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन….
 
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली…
 
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पिढ़ी आली…
 
अंगठे दुखतायत आता Type करून
माणसं भेटतायतं आता Skype वरुन…
 
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता…
 
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय…
 
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले ‘Connected’,
पण शेजारधर्म ‘Was Totally Disconnected’…
 
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
‘देव देव’ काय करता, पूजा करायचं पण App आलाय आता….
 
या ‘Technology’ मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता….
 
विसरले सारे चव आईच्या भाजीची, अन्
शुर गाथा शिवऱायानची .
 
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या ‘Technology’ ची…
 
तुळशी” ची जागा आता “Money Plant” ने
घेतलीय…!!
 
“काकी” ची जागा आता Aunt ने घेतलीय…!!
वडील जिवंतपणिचं”डैड” झाले,
अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले….??
 
भाऊ “Bro” झाला आणि बहीण “Sis”…!!
दिवसभर मुलगा CHATTING च नाही करत,
तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो…!!
 
दुध पाजणारी आई, जिवंतपणीचं “Mummy”
झाली…!!
 
घरची भाकरं आता कशी आवडणार हो… ५ रु. ची Maggi
आता किती”Yummy” झाली…!!
 
माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय….
 
बघा जमल्यास विचार कर …
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अल्लू अर्जुनच्या 'राका'चा फर्स्ट लूक आउट

अल्लू अर्जुनने अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या; एका चित्रपटात काम करण्यासाठी घेतो एवढे मानधन

Funny Joke मी नेहमीच कसा गाढव दिसतो

Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात

अभिनेत्री नंदिता पाटकर विवाहबंधनात: मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने; पाहा लग्नाचे खास फोटो आणि तिचा जोडीदार कोण?

पुढील लेख
Show comments