Dharma Sangrah

Whatsapp Message : दोघे

Webdunia
मुलगी आमची युरोपात असते 
आणि मुलगा यूएस मध्ये असतो 
इथे मात्र आम्ही दोघेच असतो 
 
जावई मुलासारखा वागतो 
सुनेतही मुलीचाच भास होतो 
इकडे या इकडेच  या 
दोघांचाही आग्रहच असतो 
इथे मात्र आम्ही दोघेच असतो !
 
हिचं महिला मंडळ आहे 
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो 
मला कसलीच आवड नाही 
मी एकटाच घरी बसतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
संध्याकाळी ती सिरीयल बघते 
आणि मी फिरायला जातो 
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो 
मग मी आपसूक घरी येतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
एकदा मुलाचा फोन येतो 
एकदा मुलीचा फोन येतो 
काळजीनं चौकशी करतात 
आमचाही उर भरून येतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
नव्या नवलाईन जाऊनही आलो 
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो 
पण ते सगळं मात्र तेवढंच 
काही म्हणा, तिकडं जीव गुदमरतो 
कारण आम्ही  दोघेच असतो !
 
नाही तक्रार नाही कसलीच इथे 
आणि नाही कसली तक्रार तिथे 
नाही कसली अडचण सुखाची 
पण इथली सगळी वर्षे आठवतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
भांडण तंटे आमचे खूप होतात 
नसते तिला स्मरण नि मला आठवण 
खरे तर काहीच नसते वादाचे कारण 
मग आम्हीच आम्हाला समजावतो 
कारण आम्ही दोघेच असतो !
 
खरोखर तिला कवठी चाफा आवडतो 
तो एकाच फुलवाल्याकडे मिळतो 
नेहमीच तो मिळतो असे नाही 
पण तो आला कि मी नक्की आणतो 
कारण आम्ही दोघेच असतो ! 
 
हल्ली कधी कधी ती भावुक होते 
तुमच्याआधी मला जायचंय म्हणते 
मग मी म्हणतो, माझे कसे होणार ? 
म्हणते कशी, तुम्ही असेच स्वार्थी ! 
मी जाणार त्याचे काहीच नाही 
काळजी काय, तर माझे कसे होणार ?
लुटुपुटुचे असते हे तिचे नि माझे 
यावर तीही मग हसते नि मीही हसतो 
कारण आम्ही दोघेच असतो ! 
कारण आम्ही दोघेच असतो !!
 
-सुनील गोडसे
सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments