Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 February 2025
webdunia

कँलेंडर

कँलेंडर
, शनिवार, 30 डिसेंबर 2017 (13:02 IST)
कँलेंडरची पाने चाळता-चाळता सहज विचार आला मनात ...
संपत आले हे ही वर्ष, अगदी महीना राहीला शिल्लक...
आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात किती सहज ना...
 
रोज दिवस उगवतो...
रोज मावळतो...
एक एक दिवस पोटात साठवतो...
 
मागच्या तारखांवर नजर फिरवताता,
काही दिनांकावर रेंगाळत राहते मन बराच वेळ...
 
त्या सुखद आठवणी होतात ताज्या आणि मनाला जाणवतो एक सुखद गारवा...
काही तारखा उगीच करतात जखमा ताज्या आणि अश्रुंचा बांध जातो फुटून...
 
सुख-दुःखाच्या तारखा...
हास्य-अश्रुंच्या तारखा...
मान-अपमानाच्या तारखा...
विश्वास- बेईमानीच्या तारखा...
खऱ्या-खोट्याच्या तारखा...
हव्या-नकोशा तारखा...
प्रेम-द्वेषाच्या तारखा...
आपल्या परक्याच्या तारखा...
ऊन-सावलीच्या तारखा...
 
अशा अगणित तारखा येऊन जातात वर्षभरात...
आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर तशीच राहते टिकून...
 
आणि मनात विचार येतो...
 
आता येईल नवीन कँलेंडर आयुष्याच्या वेगवेगळ्या तारखा घेऊन...!!
        शुभ प्रभात

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनी सिंगचे नवे गाणे,रिलीज होताच गाण्याचा नवा रेकॉर्ड