rashifal-2026

ढेरी पुराण

Webdunia
ढेरीची काळजी करू नका
 
मित्र म्हणला सर एखादी
ढेरीवर कविता लिहणार का ?
ढेरीवाल्या माणसांचे
सुख दुःख मांडणार का ?
 
गोल गरगरीत ढेरी पाहून
मला सगळे हसतात
तुम्हीच सांगा रोड माणसं
कुठे निरोगी असतात ?
 
काही काही हडकुळे
कच्चून दाबून खातेत
काय माहीत कशामुळे
मड्यावणी दिसतेत
 
आमची ढेरी पाहून जेंव्हा
लोकांना हासू फुटतं
काहीही म्हणा मला तेंव्हा
खूप बरं वाटतं
 
प्रत्येकजण हल्ली उगीच 
टेन्शन मध्ये दिसतो
आमची गोल ढेरी बघून
खळकन खुदकन हासतो
 
त्याचं हासू पाहून मला
आनंद होतो खूप
म्हणून म्हणतो बायकोला मी
वाढ भातावर तूप
 
का कुं करत ती म्हणते
ढेरी कडे पहा
मी म्हणतो काळजी नको
तू शांत रहा
 
ती म्हणते चाला, पळा
काहीतरी करा
तुमच्या गोल ढेरी पेक्षा
आपला माठ बरा
 
मला ढेरी आहे यात
माझी काय चूक
तूच म्हणतेस खाऊन घ्या
लागली नाही का भूक ?
 
मित्रांनो ढेरी म्हणजे
समाधानाचं प्रतीक
जास्त काळजी नका करू
होईल सगळं ठीक
 
मला वाटतं ज्यांना ज्यांना
मोठी ढेरी असावी
बहुतेक त्यांची बायको
नक्की सुगरण असावी
 
कोणत्याही भाजीला
छानच चव असते
जणू काही अन्नपूर्णा
त्यांना प्रसन्न असते
 
सगळं खरं असलं तरी
ढेरी कमी करू
योग, प्राणायाम करत करत
मोकळ्या हवेत फिरू

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments